शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

टोळी वर्चस्वातून कऱ्हाडमध्ये युवकावर ११ गोळ्या झाडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 2:10 PM

कऱ्हाड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (वय ३०) या तरुणावर समोरुन ११ गोळया झाडून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेमुळे कऱ्हाड शहरात तणावाचे वातावरण असून हा खून टोळी वर्चस्वातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

ठळक मुद्देटोळी वर्चस्वातून कऱ्हाडमध्ये युवकावर ११ गोळ्या झाडून खूनआरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

सातारा : कऱ्हाड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (वय ३०) या तरुणावर समोरुन ११ गोळया झाडून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेमुळे कऱ्हाड शहरात तणावाचे वातावरण असून हा खून टोळी वर्चस्वातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन सोळवंडे हा कऱ्हाड येथील बुधवार पेठेमध्ये राहत होता. रात्री पावणे एकच्या सुमारास पवन हा जेवण करून घराबाहेर आला. याचवेळी त्याच्या घरासमोर दबा धरून बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळीबाराचा वर्षाव केला.

तब्बल अकरा गोळ्या पवनच्या छातीमध्ये, डोक्यामध्ये घुसल्या. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. काही क्षणातच हल्ला झाल्यामुळे त्याच्या घरातल्यानाही याची कल्पना आली नाही. गोळीबाराच्या आवाजाने शेजारी काही लोक बाहेर आले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले होते.पवन याच्यावरही खंडणी, जबरी चोरी, मारहाण अशा प्रकारचे कऱ्हाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसापूर्वीच पवनवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. हा खून टोळी वर्चस्वातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

या खून प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पथके रवाना केली आहेत. या खून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर