मोहित देवधरखंडाळा : यात्रेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात शोभेच्या दारुगोळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खंडाळा तालुक्यातील बावडा गावच्या यात्रेमध्ये गावातीलच तिघांनी अक्षय गणेश पवार (वय २९) या तरुणावर कोयत्याने वार करत जखमी केले आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गावच्या यात्रेनिमित्त छबीना कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, अक्षय पवार हा या कार्यक्रमासाठी गेला असताना रात्रीच्या सुमारास रोहित रवींद्र पवार, आकाश पानसरे, अमित संजय पवार (सर्व रा.बावडा, ता.खंडाळा, जि. सातारा) या तिघांनी अक्षयला अडवून त्याच्या पाठीवर कोयत्याने वार केले. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या अक्षय पवार याच्यावर सध्या शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. याबाबत अक्षय पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून रोहित पवार, आकाश पानसरे, अमित पवार यांच्याविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार संजय पोळ हे करीत आहेत.
Satara: यात्रेत कोयत्याने वार केल्याने तरुण जखमी, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:57 IST