गुंड गजा मारणेला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील तरुणांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:42 IST2025-05-15T12:41:42+5:302025-05-15T12:42:14+5:30

गजा मारणे याला पोलिस व्हॅनमध्येच त्याच्या कार्यकर्त्यांनी जेवण आणून दिले

Youth from Satara who went to meet gangster Gaja Marane will be questioned | गुंड गजा मारणेला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील तरुणांची होणार चौकशी

गुंड गजा मारणेला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील तरुणांची होणार चौकशी

सातारा : सातारा शहराजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलेला पुण्यातील गुंड गजा मारणे याला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील काही तरुणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

गुंड गजा मारणे याला महिनाभरापूर्वी पुण्यातून न्यायालयीन कामकाजासाठी सांगली येथे नेण्यात आले होते. त्याच्यासोबत पोलिस व्हॅन आणि पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यावेळी साताऱ्याजवळील एका ढाब्यावर सर्वजण जेवणासाठी थांबले होते. गजा मारणे याला पोलिस व्हॅनमध्येच त्याच्या कार्यकर्त्यांनी जेवण आणून दिले. 

हा सारा प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पुणे पोलिसांची चाैकशी झाली. त्यातून पाच पोलिसांचे निलंबनही करण्यात आले आहे; परंतु आता हा प्रकार साताऱ्याजवळ घडल्याने गजा मारणे याला साताऱ्यातून कोणकोण भेटायला गेले होते, याची चाैकशीही पोलिसांनी सुरू केली आहे. जे कोणी त्याला भेटले असतील, त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. त्यानंतरच पुढे काय कारवाई करायचे, ते ठरवले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Youth from Satara who went to meet gangster Gaja Marane will be questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.