साताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:03 IST2020-09-26T17:01:10+5:302020-09-26T17:03:08+5:30
सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील आकाश शरद लाटकर (वय ३०) याने शनिवारी सकाळी आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

साताऱ्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
सातारा: येथील यादोगोपाळ पेठेतील आकाश शरद लाटकर (वय ३०) याने शनिवारी सकाळी आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश लाटकर याचे मोती चौकामध्ये पेढ्याचे दुकान आहे. या दुकानांमध्ये तो
वडिलांसमवेत काम करत होता. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे तो जेवण करून बेडरूममध्ये झोपण्यास गेला. मात्र शनिवारी सकाळी बराच वेळ तो बेडरूममधून बाहेर आला नाही म्हणून घरातल्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आकाशने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे समोर आले नसून पोलीस नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत.