Local Body Election: भाजपचा प्रचार का करतो म्हणत तरूणाला मारहाण; साताऱ्यात २० जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:31 IST2025-12-04T19:30:04+5:302025-12-04T19:31:20+5:30
सातारा : नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान गोडोली येथील प्रभाग क्रमांक १८ च्या मतदान केंद्र परिसरात भाजपचा प्रचार का करतोय, असे ...

Local Body Election: भाजपचा प्रचार का करतो म्हणत तरूणाला मारहाण; साताऱ्यात २० जणांवर गुन्हा
सातारा : नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान गोडोली येथील प्रभाग क्रमांक १८ च्या मतदान केंद्र परिसरात भाजपचा प्रचार का करतोय, असे म्हणत एका तरूणाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहित संदेश खुस्पे (रा. गोळीबार मैदान, गोडाली) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच ते सव्वा पाचच्या सुमारास गोडोली येथील राजमाता उद्यानासमोर मी उभा होतो. यावेळी अपक्ष उमेदवाराचे कार्यकर्ते तेथे आले. ‘तू माझ्या विरोधात भाजपचे काम करतो, असे म्हणत त्यांनी तलवारीने खून करण्याची मला धमकी दिली. त्यानंतर दांडके व पाईपने मारहाण केली. असेही मोहित यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.