सामाजिक चळवळीत युवकांनी सक्रिय व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST2021-05-20T04:42:15+5:302021-05-20T04:42:15+5:30

म्होप्रे, ता. कऱ्हाड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गणेश शिरतोडे, विजय पवार यांच्यासह युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ...

Young people should be active in the social movement | सामाजिक चळवळीत युवकांनी सक्रिय व्हावे

सामाजिक चळवळीत युवकांनी सक्रिय व्हावे

म्होप्रे, ता. कऱ्हाड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गणेश शिरतोडे, विजय पवार यांच्यासह युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोर साठे म्हणाले, बदलती सामाजिक समीकरणे व राजकीय घडामोडी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेला आमूलाग्र बदल लक्षात घेता भविष्यामध्ये मागासवर्गीय समाजाला बदलत्या परिस्थितीनुसार विकासाच्या प्रवाहात ठेवायचे असेल तर युवकांनी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी सहभागी झाले पाहिजे. समाजाची बांधणी करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. संघटन ही मोठी ताकद आहे. या ताकदीचा वापर करून युवकांनी चळवळ उभी करावी. ही काळाची गरज आहे.

यावेळी रोहीत राजेंद्र कांबळे यांना पुरोगामी संघर्ष परिषदेचे तालुका अध्यक्ष पद देण्यात आले. संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.

Web Title: Young people should be active in the social movement