बहिणीशी प्रेमसंबंधावरून तरूणाला बेदम मारहाण, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:32 IST2026-03-16T15:32:13+5:302026-03-16T15:32:53+5:30

संबंधित तरूण गंभीर जखमी

Young man brutally beaten up over love affair with sister in Satara | बहिणीशी प्रेमसंबंधावरून तरूणाला बेदम मारहाण, साताऱ्यातील घटना

संग्रहित छाया

सातारा : बहिणीशी प्रेमसंबंधावरून एका १८ वर्षीय तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये संबंधित तरूण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १३ रोजी रात्री शहरालगत असलेल्या एका गावात घडली.

संबंधित तरूणाचे एका तरूणाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याला लोखंडी राॅड, पट्ट्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये संबंधित तरूण गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात संबंधित तरूणांविरोधात तक्रार दाखल केली. हवालदार निकम हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : सतारा: बहन के रिश्ते पर युवक की पिटाई, चार पर मामला दर्ज

Web Summary : सतारा में एक 18 वर्षीय युवक को एक लड़की के साथ संबंध के शक में बेरहमी से पीटा गया। गंभीर रूप से घायल युवक ने चार लोगों के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Satara: Youth Beaten Over Sister's Relationship, Four Booked

Web Summary : An 18-year-old in Satara was brutally attacked with rods and belts due to suspicions of a relationship with a girl. Seriously injured, he filed a police complaint against four individuals. Police are investigating.