महात्मा फुले विचार मंचचे कार्य कौतुकास्पद : अनपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST2021-02-21T05:12:35+5:302021-02-21T05:12:35+5:30

आदर्की : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सुराज्य निर्माण केले. त्यांच्या विचारांची पाठराखण करत माळी ...

The work of Mahatma Phule Vichar Manch is admirable | महात्मा फुले विचार मंचचे कार्य कौतुकास्पद : अनपट

महात्मा फुले विचार मंचचे कार्य कौतुकास्पद : अनपट

आदर्की : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सुराज्य निर्माण केले. त्यांच्या विचारांची पाठराखण करत माळी बेंद येथील तरुणांनी एकत्र येऊन शिवजयंती उत्सव साजरा केल्याने महात्मा फुले विचार मंचचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांनी व्यक्त केले.

माळी बेंद (सासवड, ता. फलटण) येथे शिवप्रतिमा पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रा. शिवाजी रासकर, प्रा. नवनाथ रासकर, सरपंच राजेंद्र गुलाब काकडे, कुणाल झणझणे, माजी सरपंच संगीता जाधव, माजी अध्यक्ष म्हकू अनपट, ग्रामपंचायत सदस्य अमोल रासकर, अनिल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य श्रुती जाधव, नीलम कुंभार आदी महात्मा फुले विचार मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिल भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. अमोल रासकर यांनी आभार मानले.

Web Title: The work of Mahatma Phule Vichar Manch is admirable