Satara Crime News: शिवडेतील विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह, ओळख पटविण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:45 IST2026-01-30T14:44:36+5:302026-01-30T14:45:15+5:30

परिसरात उडाली खळबळ

Woman's body found in a well in Shivde Satara | Satara Crime News: शिवडेतील विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह, ओळख पटविण्याचे काम सुरू

Satara Crime News: शिवडेतील विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह, ओळख पटविण्याचे काम सुरू

उंब्रज : शिवडे येथील विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय मारुती भोसले हे गुरुवार, दि. २९ रोजी सकाळी शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेले होते. ते विहिरीजवळ मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतील पाण्यावर स्त्री जातीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने उंब्रज पोलिस ठाण्यास कळविले. 

उंब्रज पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत मिळून आलेला महिलेचा मृतदेह हा अनोळखी असल्यामुळे मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title : सतारा: कुएं में मिला महिला का शव; शिनाख्त की जा रही है

Web Summary : सतारा के शिवडे में एक कुएं में अज्ञात महिला का शव मिला, जिससे इलाके में दहशत फैल गई। विजय भोसले को गन्ना के खेत की सिंचाई करते समय शव मिला। उमराज पुलिस जांच कर रही है और मृतक की पहचान करने में जुटी है।

Web Title : Satara: Woman's Body Found in Well; Identification Efforts Underway

Web Summary : An unidentified woman's body was discovered in a well in Shivade, Satara, causing local alarm. Vijay Bhosle found the body while irrigating his sugarcane field. Umbraj police are investigating and working to identify the deceased.