‘वॉटर कप’च्या धर्तीवर तिरकवाडी ग्रामस्थांकडून तलावाचे रुंदीकरण : जलक्रांतीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:48 PM2018-05-04T22:48:50+5:302018-05-04T22:48:50+5:30

 Widening of the pond by the Tirakwadi villagers on 'Water Cup' | ‘वॉटर कप’च्या धर्तीवर तिरकवाडी ग्रामस्थांकडून तलावाचे रुंदीकरण : जलक्रांतीचा निर्धार

‘वॉटर कप’च्या धर्तीवर तिरकवाडी ग्रामस्थांकडून तलावाचे रुंदीकरण : जलक्रांतीचा निर्धार

Next
ठळक मुद्देयुवकांकडूनही उत्स्फूर्तपणे श्रमदान

फलटण : पाणी टंचाईवर मात करण्याच्या निर्धाराने तिरकवाडी (ता. फलटण) येथील तरुणाईने एकत्रित येत वॉटर कपच्या धर्तीवर श्रमदान केले. येथील पाझर तलावाची खोली व रुंदीकरण केल्याने या तलावातील पाणी साठवण क्षमता ६ लाख ३० हजार लिटरने वाढणार आहे. दरम्यान, पुढील काळातही एकत्रितपणे श्रमदानातून चांगले उपक्रम राबविण्याचा निर्धार येथील युवक व ग्रामस्थांमधून करण्यात आला आहे.
तिरकवाडी येथे वॉटर कपच्या धर्तीवर आयोजित एक दिवसीय श्रमदान शिबिरात युवा पिढी एकवटली असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी एकाच दिवसात ओढ्यावरील सिमेंट बंधाऱ्याची गळती बंद करून खोलीकरण पूर्ण केले. या निमित्ताने सर्वांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण उभा केला आहे.
श्रमदानाचा प्रारंभ गावचे उपसरपंच शिरिषकुमार सोनवलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. यावेळी कृषी पर्यवेक्षक राजेंद्र पाळवे, मंडल कृषी अधिकारी चोपडे, कृषी सहायक डी. टी. मुळीक, ग्रामपंचायत सदस्य बापूराव पवार, पोलीस पाटील अमोल नाळे, श्रीधर कदम, सागर पवार, नितीन पवार, श्रीहरी भिसे, हरिभाऊ खरात, रामभाऊ खरात, नाथा काळे, शीतल लंगडे उपस्थित होते.
दरम्यान, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, अभियंता प्रीतम जगताप, अभियंता अजय शितोळे, जाणता राजा फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन डांगे, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. वि. रा. त्रिपुटे, दामुअण्णा रणसिंग, विंचुर्णीच्या माजी सरपंच अस्मिता निंबाळकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल पिसाळ, उत्तमराव भोसले, सौरभ जाधव, युवराज सोनवलकर, फुलचंद सोनवलकर, विकास सोनवलकर, पंकज शिंदे, आदींसह ग्रामस्थांनी यावेळी श्रमदान केले.

रुंदीकरणामुळे साठवण क्षमता ४४ लाख लिटर
श्रमदानामुळे सिमेंट बंधाºयाची गळती मोठ्या प्रमाणात बंद होणार आहे. या पाझर तलावाची पाणी साठवणूक क्षमता सुमारे ३८.१४ लाख लिटर होती. परंतु श्रमदानात केलेल्या खोलीकरणाने व रुंदीकरणाने साठवणूक क्षमता आता सुमारे ४४.४४ लाख लिटर एवढी वाढली आहे. त्यामुळे पावसाने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढून येथील ओढ्याच्या बाजूच्या व परिसरातील विहिरी, बोअर यांना पाणी वाढणार आहे.

Web Title:  Widening of the pond by the Tirakwadi villagers on 'Water Cup'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.