सव्वा वर्षाची लॉटरी कोणा-कोणाला?

By Admin | Updated: September 11, 2014 23:01 IST2014-09-11T22:07:45+5:302014-09-11T23:01:23+5:30

कऱ्हाड तालुका : म्हणे, निष्ठावंतांचे ‘हाल’ अन् इच्छुकांच्या ‘चाली’ सुरू

Who is the first lottery of the year? | सव्वा वर्षाची लॉटरी कोणा-कोणाला?

सव्वा वर्षाची लॉटरी कोणा-कोणाला?

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हाड दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या पदांची सव्वा वर्षाची वाटणी करण्याचे संकेत दिले़ आता या निवडीत लॉटरी कोणाला लागणार? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत़
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत २५ जागांपैकी १२ जागा काँग्रेसला, ९ राष्ट्रवादीला मिळाल्या़ ३ उंडाळकर समर्थक अपक्षांनीही बाजी मारली़ त्यात ४ काँग्रेस सदस्यही उंडाळकर गटाचेच़ तरीही राज्यातल्या आघाडीप्रमाणे येथे आघाडी कायम राहील, अशी अटकळ बांधली जात होती; पण घडले भलतेच़
राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार बाळासाहेब पाटील समर्थक सदस्यांना काँग्रेसचे आमदार विलासराव पाटील-उंडाकारांनी तीन अपक्षांची रसद पुरवली अन् काँग्रेसची सदस्य संख्या जास्त असतानाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कऱ्हाडात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत ‘देवराज’ आले; अन् उपसभापती पदासाठी सैदापूरच्या जाधवांच्या रूपाने जणू ‘विठ्ठल’ पावला़
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे काय राहणार? याबाबत उत्सुकता आहे़

Web Title: Who is the first lottery of the year?