शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंचा पक्षप्रवेश काळ्या दगडावरची पांढरी रेष : अतुल भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:06 IST

कऱ्हाड : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्या जात आहेत. उदयनराजेंचा पक्षप्रवेश ही काळी दगडावरची पांढरी रेष असून, ...

ठळक मुद्देउदयनराजेंचा पक्षप्रवेश काळ्या दगडावरची पांढरी रेष : अतुल भोसलेमहाजनादेश यात्रा ही कुंभमेळ्याप्रमाणे दिसेल

कऱ्हाड : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्या जात आहेत. उदयनराजेंचा पक्षप्रवेश ही काळी दगडावरची पांढरी रेष असून, त्यांचा उद्या (शनिवारी) दिल्ली येथे पक्षप्रवेश होणार आहे. कऱ्हाड -दक्षिणोत्तरमधीलही पक्षप्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आमच्याकडे आहे. वेळ आल्यानंतर ती जाहीर करू, असे पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, रविवार, दि. १५ रोजी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही सातारा जिल्ह्यात येणार असून, ती एक कुंभमेळ्याप्रमाणे दिसेल, अशी माहिती त्यांनी कऱ्हाड पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सातारा जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कविता कचरे, अ‍ॅड. दीपक थोरात आदी उपस्थित होते.डॉ. भोसले म्हणाले, आता नेत्यांनाही कळू लागलं आहे की भाजपा हा कसा पक्ष आहे, त्यामुळे आतापर्यंत अनेकांकडून पक्षात प्रवेश केला जात आहे. अजूनही पक्षप्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आमच्याकडे आहे.विक्रम पावसकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही रविवारी सातारा जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यात आल्यानंतर वाईत त्यांची स्वागत सभा होईल, पुढे सातारा येथे महासभा त्यानंतर कऱ्हाडकडे ही यात्रा प्रस्थान करेल.

या ठिकाणी कृष्णा कॅनॉल येथे या यात्रेचे कऱ्हाड उत्तर-दक्षिणच्यावतीने स्वागत केले जाईल. तसेच छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडेल. या सभेस पश्चिम महाराष्ट्रातून साधारणत: तीस हजार लोक उपस्थित राहतील, असा विश्वास पावसकर यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाSatara areaसातारा परिसर