शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

काकडीच्या मुळाला गव्हाच्या काडाचे आच्छादन

By admin | Updated: March 20, 2016 23:23 IST

कोपर्डे हवेलीतील शेतकऱ्याचा प्रयोग : उष्णता कमी करणाऱ्या महागड्या ‘मल्चिंग पेपर’ला फाटा; उत्पादन खर्चात बचत

उन्हाळी हंगाममध्ये पिकांचे उत्पादन घेणे अडचणीचे असते. तापमानात सतत वाढ होत असल्यामुळे पिकांचे उत्पादन कमी निघते. काही वेळेस संपूर्ण पीकच वाया जाते. उत्पादन कमी निघत असल्यानेच उन्हाळी हंगामात माळव्याच्या पिकाला दर मिळतो. त्यासाठी कोपर्डे हवेलीतील शेतकरी महादेव चव्हाण यांनी काकडीला तापमानाचा सामना करण्यासाठी मल्चिंग पेपरऐवजी गव्हाच्या काडाचा वापर केला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादन वाढीस मदत होणार आहेकाकडी पिकाचे उत्पादन उन्हाळी हंगामात घेणे अवघड असते. वाढत्या तापमानामुळे उत्पादन घटते. कोपर्डे हवेलीतील महादेव चव्हाण यांनी एक एकर क्षेत्रामध्ये काकडीचे पीक घेताना तापमानाचा सामना करण्यासाठी गव्हाचे काड रोपांच्यामध्ये टाकले आहे. एक एकरात काकडीच्या ७ हजार ७०० रोपांची लागण केली आहे. एका रोपाची किंमत १ रुपये ६० पैसे असून, त्यांना रोपासाठी बारा हजार खर्च आला आहे. दोन सरीतील अंतर पाच फूट आहे. रोपातील अंतर दीड फूट आहे. रोपांच्या लागणीपासून ४५ दिवसांत उत्पादन सुरू होते. ठिबक सिंचनचा वापर करण्यात आल्याने पाणी योग्य पद्धतीने देता येते. रोपांचे वेल तारेवर चढविण्यासाठी खांब रोवले आहेत. सध्या बाजारपेठेत काकडीचा दहा किलोचा दर २५० रुपये आहे. ऐन उन्हाळ्यात एप्र्रिल, मे, जूनमध्ये काकडीचा दर उच्चांकी असतो. काकडीचे पीक वजनी असल्याने उत्पादन चांगले आल्यास शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. उन्हाळ्याच्या कालावधीत शेतकऱ्यांचा माळव्याचा आधार असतो. माळव्याचे पीक चांगले आले तरच त्यांना पुढील पिकासाठी व घरखर्चासाठी पैशाचे तजवीज करता येते. सात-आठ लाखांपर्यंत काकडी पिकाचे उत्पादन निघेल, असा अंदाज महादेव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तापमान कमी, तणाचाही नायनाटउन्हाळ्यात पिकाच्या मुळावर होणारा उष्णतेचा मारा कमी करण्याचे काम मल्चिंग पेपर करतो. गव्हाचे काडही तेच काम करते. काकडीच्या मुळाशी होणारा उन्हाचा तडाखा काड शोषून घेतात. तसेच पहाटे पडणारे दवही साठवून ठेवण्याचे काम काड करते. त्यामुळे दिवसात शेतातील तापमान कमी होते. काडाचे आच्छादन असल्याने तण येत नाही. पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. परिणामी, उत्पादन वाढीस मदत होते.