शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने शंभूराजना काय मिळाले !

By admin | Updated: November 23, 2015 00:30 IST

प्रशासनावर पकड वाढली : भूकंपग्रस्त दाखल्यांचा श्रेयवाद आता संपणार

अरुण पवार --पाटण -शिवसेना पक्षातून आमदारकी मिळाली; परंतु मंत्रिपद मिळाले नाही. मात्र, वर्षभरात पाटण तालुक्यासाठी ९५ कोटींची कामे केल्याचा दावा आणि लगेचच मुख्यमंत्री मित्राला पाटणमध्ये आणून पाटण तालुक्याच्या समस्यांवर गाऱ्हाणे. आमदार झाल्यानंतर एवढं सगळं एका वर्षात करून दाखविणाऱ्या शंभूराज देसार्इंना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आणखीनच बळ आले असून, आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीही त्यांचे नाव पुढे आले आहे. त्यातच पाटणमधील भूकंपग्रस्त दाखल्यांचा श्रेयवाद संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.विधानसभेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जास्त मतांनी विजय प्राप्त झाल्यानंतर शंभूराज देसार्इंनी आपली कामाची पद्धत अधिकच गतिमान केल्याचे दिसते. याउलट विरोधक विक्रमसिंह पाटणकरांनी त्यामानाने कसलेही पाऊल उचलल्याचे जाणवत नाही.म्हणूनच आता पाटण तालुक्यात फक्त देसार्इंची चलती असल्याचे दिसत आहे. यातच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटणमध्ये आणून देसार्इंना आणखीनच बळ मिळाले आहे. मंत्रिपदाची चर्चा, भूकंपग्रस्तांचे दाखले याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांच्या तोंडून वदवून घेण्याची किमया त्यांनी केली. दुसरीकडे दिवाकर रावतेंनाही शंभूराज देसार्इंसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकावा लागणार, हे भाषणात सांगावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पाटण दौऱ्याचे फलित काय मिळणार? हे आगामी काळात पाहावयास मिळणार आहे. मात्र, सध्या देसार्इंनी पाटणच्या राजकारणात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. पाटणच्या जनतेला मैत्रीचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शंभूराज देसाई यांची मैत्री असल्याची चर्चा होती. याचे दर्शन पाटणच्या जनतेला पाहावयास मिळाले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी २००४ ते २००९ या कालावधीत त्यांच्या मैत्रीचा विधानसभेतील एक किस्साही सांगितला. पालकमंत्र्यांवर पडली छापशंभूराज देसार्इंनी ‘पालकमंत्री विजय शिवतारे यांना सातारा जिल्ह्यात मीच सहकार्य करतो, हाक मारतील तिथे हजर असतो,’ असे सांगितले. परंतु ‘डीपीडीसीतील पाच कोटींचा निधी वापराबाबत माझे पालकमंत्र्यांनी ऐकले नाही,’ असे सांगून देसार्इंनी मुख्यमंत्र्यांसमोर पालकमंत्र्यांवर छाप पाडली.