शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माण, खटावसाठी पाण्याचा लढा पुढेही कायम राहील : येळगावकर

By admin | Updated: August 20, 2016 22:10 IST

वडूजला भाजपचा मेळावा : कॉँग्रेस, राष्ट्रवादीने भ्रमनिरास केला

वडूज : ‘केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होऊ लागली आहेत. आपल्या आमदार पदाच्या काळात तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर भरून काढण्यात आला. त्यानंतरच्या काळात मात्र ही विकासकामांची गती मंदावली आहे. खटाव-माण तालुक्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपला लढा यापुढेही कायम राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यकर्त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. आगामी निवडणुकांना कार्यकर्त्यांनी एकदिलाने सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे,’ असे आवाहन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर केले.येथील मंगल कार्यालयात तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावादरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी संघटक मंत्री रवींद्र अनासपुरे, सरचिटणीस अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता कचरे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्प शहा, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, अनिल भोसले, सतीश शेटे, चंद्रकांत काळे, डॉ. महादेव कापसे, वसंतराव घाडगे, भरत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला माजी आमदार दिवंगत तात्याराव जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र पाटील आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विकल्पशेठ शहा आदींची भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रदीप शेटे यांनी स्वागत केले. मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सतीश शेटे यांनी आभार मानले.यावेळी चंद्रकांत खुस्पे, हणमंतराव देशमुख, किसनराव इंगळे, अशोक काळे, बाळासाहेब गोडसे, सुशील तरटे, अनिल माळी, गोपीचंद खाडे, सुयोग शेटे, किशोरी पाटील, विक्रमसिंह घाडगे, अजय शेटे, हिंदुराव बोडके, इकबाल शेख, सज्जाद शेख, राकेश सोनटे, अमिन मुल्ला, आकाराम बोडके, गणपत खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) आगामी निवडणुका ताकदीने लढवाव्यात : भोसलेअतुल भोसले म्हणाले, ‘सरकारच्या माध्यमातून गावोगावी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी प्रत्येक गावात भाजपाची शाखा व कार्यकर्ते सक्रिय झाले पाहिजेत. शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कार्यकर्त्यांनी जागरूकपणे तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. आगामी काळात होणाऱ्या येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तसेच वडूज, दहिवडी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकाही कार्यकर्त्यांनी ताकदीने लढाव्यात.