पिंपोडे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:11 IST2018-07-10T16:06:28+5:302018-07-10T16:11:54+5:30

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील पेरणी केलेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर अधूनमधून होणारा पाऊस न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाईची चिंता कायम आसल्याचे दिसून येत आहे.

Waiting for rain for farmers in Pimpode Budruk area | पिंपोडे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

पिंपोडे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

ठळक मुद्देपिंपोडे बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षावर्तमान ठिकठाक; भविष्याची चिंता कायम !

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील पेरणी केलेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर अधूनमधून होणारा पाऊस न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाईची चिंता कायम आसल्याचे दिसून येत आहे.

पिंपोडे बुद्रुक परिसरात उन्हाळी हंगामात पावसाने दडी मारली तरी जूनच्या सुरुवातीस व नंतरच्या काळात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पेरणीची कामे मार्गी लागली.

त्यानंतरच्या काळातही अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे परिसरातील पेरणी केलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे सध्यातरी परिसरातील पिकांची स्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु चालूवर्षी उन्हाळी हंगामात एकही पाऊस न झाल्याने व त्यानंतरही परिसरात जोराचा पाऊस न झाल्याने परिसरातील पाणी साठे पूर्णत: कोरडे आहेत. शेतकऱ्यांना भविष्यातील पाणीटंचाईची चिंता आसल्याचे दिसत येत आहे.

यावर्षी परिसरात ऊस व इतर बागायती पिकाखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे. तसेच परिसरातील करंजखोप, रणदुल्लाबाद गावांनी प्रथमच वॉटर कपसाठी कंबर कसून खूप मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली. परंतु पावसाळा सुरू होऊनही पुरेसा पाऊस न झाल्याने परिसरातील बहुतांशी पाणी साठे पूर्णत: कोरडे आहेत. शेतकऱ्यांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Web Title: Waiting for rain for farmers in Pimpode Budruk area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.