शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या सभासदांना मतदार यादी प्रसिद्धीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST

कराड : सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मेमध्ये होण्याची शक्यता आहे. ...

कराड : सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मेमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील वातावरण तापले असून, संभाव्य तिन्ही पॅनलचे नेते गावोगावी बैठका घेत आहेत, तर सभासदांना मात्र आता मतदार यादीची प्रतीक्षा लागली आहे.

कृष्णा कारखान्याचे चाळीस हजारांवर सभासद आहेत. दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली १९८९ साली कारखान्यात पहिले ऐतिहासिक सत्तांतर घडले. त्यानंतर त्यांनी खुले सभासदत्व ही संकल्पना राबवली. त्यामुळे सभासद वाढले. प्रत्येक वेळी सत्तांतर झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी मर्जीतले सभासद वाढवून विजयाचा मार्ग सुकर केला.

आतासुद्धा सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांनी काही हजार सभासद वाढवल्याची चर्चा आहे. पण ती सभासद वाढ चुकीची आहे. जमीन नावावर नसलेल्या व्यक्तींनाही सभासदत्व बहाल केल्याची तक्रार संस्थापक पॅनलच्या अविनाश मोहितेंकडून साखर संघ व कराड तालुका पोलिसात करण्यात आली आहे. त्यामुळे सभासद यादीत नक्की किती सभासद मतदार असणार याची प्रतीक्षा आहे.

कोरोनामुळे पाच वर्षांचा कार्यकाल संपूनही विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळाली. मात्र, ही निवडणूक लवकर घ्यावी, अशी मागणी सभासद डॉ. अजित देसाई यांनी न्यायालयात केली होती. यावर न्यायालयाने तसे निर्देश दिल्याने सध्या तयारी सुरू झाली आहे. या आठवड्यात सभासद मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध होईल. त्यावरच्या हरकतींचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक प्रक्रिया जाहीर होईल.

चौकट

...ते सभासद पाच वर्षे लटकले

यशवंतराव मोहिते यांनी खुले सभासदत्व देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. १३ हजार ५२८ शेतकऱ्यांना सभासद केले. मात्र, त्यावर भोसले गटाने आक्षेप घेतल्याने निवडणुकीत या सभासदांनी मतदान केले खरे, पण; ते मतदान वेगळ्या पेटीत ठेवून दिले होते, ते मोजलेच गेले नाही. परिणामी मोहिते गटाची सत्ता आल्यानंतर पुनर्प्रक्रिया करून संबंधितांना सभासद करून घेण्यात आले होते.

चौकट

क्रियाशील की अक्रियाशील

ज्यांनी गत पाच वर्षात किमान तीन वर्षे कारखान्याला ऊस घातलेला नाही, त्यांना अक्रियाशील सभासद ठरवण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. त्यामुळे आपण क्रियाशील सभासद आहोत, की अक्रियाशील, याची माहिती मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावरच अनेकांना कळणार आहे.

चौकट :

...तर आक्षेप घेतले जाणार

मुळातच संस्थापक पॅनलच्या कार्यकर्त्यांनी वाढीव सभासदांबाबत तक्रार दिली आहे. आक्षेप घेतलेली नावे पुन्हा मतदार यादीत आली तर त्या नावांवर पुन्हा आक्षेप घेतले जाणार यात शंका नाही. पण, यादीत कोणाची नावे येतात, याची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे.

फोटो :कृष्णा कारखाना