शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लहानथोरांना उत्कंठा मोदींच्या खटाव भेटीची

By admin | Updated: September 15, 2014 23:21 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार का इच्छापूर्ती?

नम्रता भोसले - खटाव -लोकसभा निवडणूक निर्णायक ठरवून ‘नमो’ लाटेवर भाजपचे सरकार देशात सत्तेवर आले. मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि खटावकरांच्या आशा पल्लवित झाल्या. राजकीय तसेच सामाजिक जीवनातील गुरु लक्ष्मणराव इनामदार याचे मूळ गाव खटाव असल्यामुळे आता गुरुंच्या गावी पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचे आगमन होणार ही बातमी येऊन थडकल्यामुळे आता लहान-थोर व्यक्तींमध्ये उत्सुकता लागली आहे ती मोदींच्या खटावभेटीची. नरेद्र मोदींना लहानपणापासून मार्गदर्शन करणारे, त्यांच्या राजकीय, सामाजिक घडणीत मोलाचा वाटा असणारे, ‘वकीलसाहेब’ या टोपणनावाने सर्वपरिचित असणारे गुरू लक्ष्मणराव इनामदार खटावचे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम गुजरातमधून केले.इनामदारांनी मोदींवर संघाचे संस्कार केले. नरेंद्र मोदी यांना घडवण्यात इनामदारांचा मोठा वाटा आहे. दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांचे एक बंधू अहमदाबाद येथे स्थायिक आहेत. खटावमध्ये सध्या अस्तित्वात असलेले लक्ष्मीनारायण मंदिराची इनामदार यांच्या पश्चात त्यांच्या चुलतबंधूुनी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जोपासना केली आहे. आतापर्यंत हे मंदिर खटावमधील लोकांना परिचित होते. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान लक्ष्मणराव इनामदार हे खटावचे, तसेच त्यांनी सुरुकेलेल्या लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या माध्यमातुन उभे असणारे भव्य मंदिर याविषयी माहिती वाचनात आल्यापासून खटावबद्दल बोलताना ‘पंतप्रधांनाच्या गुरुंचे गाव’ म्हणून संबोधले जात आहे. आपल्या गुरुच्या जन्मगावी भेट देणार असल्याचे मोदी यांनी सांगितले होते. त्यामुळे चक्क पंतप्रधान खटावला भेट देणार म्हणून गावकऱ्यांचीही उत्सुकता वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मोदींचे आगमन होणार का? इनामदार यांच्या तैलचित्राचे अनावरण मोदींच्या हस्ते करण्याचा मानस लवकरच पूर्ण होईल का, अशी उत्सुकता आणि आशा खटाववासीयांना लागली आहे.