आदेशाचे उल्लंघन; तीन जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST2021-06-03T04:28:04+5:302021-06-03T04:28:04+5:30

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून दिलेली माहिती ...

Violation of order; Crime on three people | आदेशाचे उल्लंघन; तीन जणांवर गुन्हा

आदेशाचे उल्लंघन; तीन जणांवर गुन्हा

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून दिलेली माहिती अशी, सुरज सर्जेराव गायकवाड (वय २६, रा. देगाव रोड, अमरलक्ष्मी स्टॉप, कोडोली), करण संजय शर्मा (वय २२, रा. निकम कॉलनी, चंदननगर, सातारा), ओम सुरेश ठाकूर (वय २९, रा. शिवराज पेट्रोल पंप, सातारा) या तिघांनी आस्थापना बंद ठेवण्याबाबत आदेश दिलेले असतानाही त्यांची टेक पोझिशन इंजिनिअरिंग ही आस्थापना सुरु ठेवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले.

रविवार पेठ हद्दीत आर. के. बॅटरी येथे गौरव मधुकर कदम (रा. गुरुवार पेठ, सातारा) हा कोविड संसर्ग वाढण्याची शक्यता असतानाही विनाकारण बाहेर फिरत होता. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल खाडे यांच्या तक्रारीनुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Violation of order; Crime on three people