शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील बाहुबलीचा व्हिडीओ व्हायरल, शेतातील चिखलातून दुचाकी खांद्यावर घेऊन बाहेर काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 21:29 IST

२५ वर्षे वयाचा विनय शंकर घोरपडे हा तरुण माण तालुक्यातील कुळकजाई (शेडगेवाडी वस्ती) येथील रहिवासी आहे.

हणमंत पाटील

सातारा : ‘बाहुबली’ चित्रपटात शिवलिंग खांद्यावर घेतल्याचा दक्षिणेतील अभिनेता प्रभासचा सीन गाजला होता. त्याप्रमाणे वळवाच्या पावसामुळे झालेल्या शेतातील चिखलातून खांद्यावर दुचाकी घेऊन जाणाऱ्या साताऱ्याच्या तरुणाचा फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर सोमवारी व्हायरल झाला. २५ वर्षे वयाचा विनय शंकर घोरपडे हा तरुण माण तालुक्यातील कुळकजाई (शेडगेवाडी वस्ती) येथील रहिवासी आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सातारा जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा जोर आहे. उन्हाळ्यात पहिल्यांदाच दुष्काळी पट्ट्यातील माण, खटाव, फलटण भागांतही अनपेक्षित पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रत्येकजण या पावसातून प्रवास करताना जुगाड करताना दिसत आहे. त्यामध्ये शेतातून जाणाऱ्या वाटेवर चिखल झाल्याने बैलगाडीलाही मार्ग काढता येत नाही. मग, दुचाकीचे काय होणार, असा प्रश्न कुळकजाई येथील तरुणाला पडला.

कुळकजाई गावच्या विनय घोरपडे नावाच्या या तरुणाने चक्क दुचाकीच बाहुबलीप्रमाणे खांद्यावर घेऊन चिखलातून मार्ग काढला. कौतुकाने दुसऱ्या मित्राने त्याचा व्हिडीओ बनविला अन् बघता-बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी व सोमवारी दोन दिवसांत प्रचंड व्हायरल झाला. आता सर्वजण कौतुकासाठी या तरुणाचा शोध घेऊ लागले.

‘त्याला’ राग येतोय...

आमचा मित्र विनय घोरपडेचे शिक्षण बारावी झाले आहे. रविवारी तो मळ्यात म्हशीच्या धारा काढण्यासाठी मित्राबरोबर गाडीवरून किटली घेऊन गेला; पण अचानक पाऊस आला. त्यामुळे शेतात चिखल झाला. त्याने पहिल्यांदा किटल्या शेतातील रस्त्यातून पुढे नेऊन ठेवल्या. त्यानंतर दुचाकीला रस्त्या नसल्याच्या रागातून त्याने चक्क गाडीच उचलून खांद्यावर घेतली. साधारण १०० मीटर अंतर चिखल तुडवत तो गाडी शेताबाहेर घेऊन गेला. त्यामुळे कौतुकाने त्याच्या मित्राने काढलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे, अशी माहिती गावातील शिवप्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सोमनाथ फडतरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :satara-acसाताराRainपाऊस