शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वेटणे झाले जलस्वयंपूर्ण ग्राम

By admin | Updated: November 9, 2014 23:26 IST

राजकारणविरहित काम : बंधाऱ्यांच्या माध्यमातून गाव झाले जलमय

पुसेगाव : दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात वेटणे गावाची भूजलपातळी कमालीची खालवली होती. गावच्या ओढ्याचे पाणी दिवाळीनंतर पाहायला मिळत नव्हते; पण मागील दुष्काळाबासून बोध घेऊन गावकऱ्यांनी ओढ्यावर मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले. जूनच्या पहिल्याच पावसात सर्व बंधारे भरून वाहू लागले. हे सारे पाहताना हाच का दोन वर्षांपूर्वीचा ओढा, असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. मागील दुष्काळ, नापिकी, चारा छावणीचा घ्यावा लागलेला आधार या सर्व गोष्टींवर मात कण्याचा चंग सरपंच पोपटराव नलवडे व ग्रामपंचायत सदस्यांनी बांधला. राजकारण आड न आणता गावच्या भल्यासाठी प्रथम मुख्यमंत्री निधीतून दोन बंधारे मंजूर केले. त्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यामातून दोन व आमदारांच्या विकास निधीतून दोन बंधारे अशा सहा बंधाऱ्यांचे काम बघता बघता पूर्ण झाले आणि आज नेर धरणात फक्त वेटणेच्या ओढ्याचा पाणी आजतागायत सुरू असल्याचे पाहायाला मिळत आहे. या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यापर्यंत विहिरींमधील पाणी टिकणार आहे. आज गावातील ९० टक्के विहिरींची पाणीपातळी जमिनीबरोबर असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारी विकासनिधी कसा वापरायचा, याचा उत्तम नमुना म्हणून वेटणे गावाने आदर्श उभा केला आहे.बंधारे उभारणीच्या कामी वेटणेचे ग्रामपंचायात सदस्य विमल नलवडे,स् ांजय नलवडे, हणमंत देवकर, शांताबाई नलवडे, संजय कोरडे, मनीषा खरात या सर्वांनी मोलाची कामगिरी बजावली. (वार्ताहर)सलग दुष्काळाने शेतकरी कोलमडून गेला होता. काहीही करून पावसाचे पाणी अडविणे ही काळाची गरज होती. म्हणून आज ६ बंधाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणी अडविण्यात यश मिळाले आहे. कोणतेही राजकारण न करता जर काम केले तर मोठ्या प्रमाणात यश मिळते.- पोपटराव नलवडे, सरपंच, वेटणे