शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याचा वजन काटा अचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST

औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात ...

औंध: खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याच्या वजन काट्यांची बुधवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी अचानक तपासणी करण्यात आली. या पथकामध्ये सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र आर. एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैधमापनशास्त्र निरीक्षक एस. जी. धोपाटे, क्षेत्रसहायक निरीक्षक व्ही. के. शिंदे कोरेगाव विभाग यांनी केली. त्यावेळी वजन काट्यामध्ये काहीही तफावत नसल्याचे आढळले.

चालू गळीत हंगामातील उत्पादित होणाऱ्या मालाला स्वदेशी तसेच परकीय बाजारपेठामध्ये चांगला भाव मिळत असून, शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर देण्यास कटिबद्ध आहे. गळितास येणाऱ्या उसाचे बिल वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची भूमिका कारखान्याची असल्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी सांगितले. कारखानदारी ही ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर व कर्मचारी या त्रिसूत्रीवर उभी असून, यातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याचे काम वर्धन अ‍ॅग्रोच्या माध्यमातून केले जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देण्याची भूमिका कारखान्याची आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजित डुबल, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ, शेती अधिकारी वैभव नलवडे, परचेस ऑफिसर, अश्विन कदम, केनयार्ड सुपरवायझर योगेश कदम, हारूण संदे तसेच ऊस उत्पादक शेतकरी अशोक देशमुख, प्रशांत घाडगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी डुबल यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवण्याचे आवाहन केले.

०३वर्धन कारखाना

फोटो:-वर्धन अ‍ॅग्रो साखर कारखान्याच्या वजन काट्याची पथकाकडून तपासणी करण्यात आली.(छाया-रशिद शेख)