आबासाहेब वीर यांचे स्वातंत्र्योत्तर काळात मोलाचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:13+5:302021-09-02T05:24:13+5:30

वाई : ‘देशभक्त किसन वीर यांनी देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीचे सातारा जिल्ह्यात नेतृत्व केले होते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर ...

Valuable contribution of Abasaheb Veer in the post-independence period | आबासाहेब वीर यांचे स्वातंत्र्योत्तर काळात मोलाचे योगदान

आबासाहेब वीर यांचे स्वातंत्र्योत्तर काळात मोलाचे योगदान

वाई : ‘देशभक्त किसन वीर यांनी देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीचे सातारा जिल्ह्यात नेतृत्व केले होते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात स्वराज्याचे सुराज्य व्हावे म्हणून विविध सामाजिक व शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचे आचार-विचार आजही नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना दिशादर्शक ठरत आहेत,’ असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

वाई येथील पंचायत समितीच्या सभागृहात देशभक्त किसन वीर यांच्या ११५ व्या जयंती समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, शारदा ननावरे, संगीता मस्कर, रंजना डगळे, नगराध्यक्ष अनिल सावंत, महादेव मस्कर, दिलीप बाबर, सत्यजित वीर, कांतिलाल पवार, लक्ष्मण पिसाळ, शशिकांत पवार, रमेश गायकवाड, राजाभाऊ सोनावणे, चरण गायकवाड, प्रदीप जायगुडे, अमोल कदम, कुमार जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी याच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझे घर-गाव व माझी शाळा’या विषयीच्या विविध भित्तीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. सभापती संगीता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने सूत्रसंचालन केले. सदस्य अनिल जगताप, मधुकर भोसले, सुनीता कांबळे, रजनी भोसले, प्रभारी गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, गट शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर यांनी स्वागत केले. उपसभापती उपसभापती विक्रांत डोंगरे यांनी आभार मानले.

Web Title: Valuable contribution of Abasaheb Veer in the post-independence period