मंत्री गोरे खंडणीप्रकरण; मथुरेतून मांत्रिकाला अटक, मुख्य आरोपी महिलेशी होता संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:57 IST2025-06-21T13:57:28+5:302025-06-21T13:57:53+5:30

वडूज पोलिसांच्या तपासाला वेग : न्यायालयाकडून स्थलांतर पत्र मंजूर

Vaduj police arrested sorcerer Ashok Chhotulal Sharma from Mathura for demanding extortion from Rural Development Minister Jayakumar Gore | मंत्री गोरे खंडणीप्रकरण; मथुरेतून मांत्रिकाला अटक, मुख्य आरोपी महिलेशी होता संपर्क

मंत्री गोरे खंडणीप्रकरण; मथुरेतून मांत्रिकाला अटक, मुख्य आरोपी महिलेशी होता संपर्क

वडूज (जि. सातारा) : ग्रामविकासमंत्रीजयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी मथुरा येथून मांत्रिक अशोक छोटूलाल शर्मा (वय ६२, रा. कृष्णकुंज लक्ष्मीनगर, नवी दिल्ली पूर्व) याला वडूज पोलिसांनी अटक केली. त्याला दिल्ली न्यायालयात हजर करून पोलिस त्याला घेऊन वडूजकडे रवाना झाले आहेत.

मंत्रीजयकुमार गोरे यांना खंडणीची मागणी व बदनामीप्रकरणी एका महिलेसह दोघांना तुरुंगवास भोगावा लागला होता. काहींना चौकशीला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, मुख्य आरोपी महिलेचा मार्गदर्शक ज्योतिषी-मांत्रिक अशोक छोटूलाल शर्मा यास वडूज पोलिसांनी मथुरा येथील मंदिराच्या भक्तनिवास परिसरातून ताब्यात घेतले.

मुख्य आरोपी महिलेशी होता संपर्क

खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी महिला आणि मांत्रिक अशोक शर्मा या दोघांमध्ये मोबाइलवरून व्हॉट्सॲप, सर्वसामान्य कॉलसह चॅटिंग झाले होते. यामध्ये खंडणी स्वरूपात किती रक्कम व कधी घ्यायची यासंदर्भात संपर्क झाला.

Web Title: Vaduj police arrested sorcerer Ashok Chhotulal Sharma from Mathura for demanding extortion from Rural Development Minister Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.