शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्रांना अखेरची घरघर...

By admin | Updated: June 12, 2015 00:49 IST

चाफळ विभागातील स्थिती : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम; लाखोंचा निधी पाण्यात; शेतकऱ्यांना मिळेना मार्गदर्शन

चाफळ : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चाफळसह पाटण तालुक्यातील अनेक गावांत कृषी विज्ञान मंडळांची स्थापना झाली. मात्र गाजावाजा करीत स्थापन झालेली ही मंडळे शेतीविषयक जागृती करण्याचे सोडाच; पण ती अस्तित्वात आहेत की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावात कृषी विभागाचे कार्यालय असतानाही अधिकारीच गायब असल्यामुळे या विज्ञान मंडळांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी यापूर्वी चाफळचा कृषी विभाग सतत जागृत असायचा. चाफळसह माजगाव, पाडळोशी, धायटी, केळोली, नाणेगाव या गावांत कृषी विज्ञान मंडळांची स्थापना करण्यात आल्या; परंतु ही मंडळे जागृत आहेत की नाही? याची कृषी अधिकाऱ्यांनी साधी चौकशीही केली नसल्याचे दिसून येत आहे. ही मंडळे जागृत करणे महत्त्वाचे आहे. मंडळे स्थापन करताना कृषी विभागाने मोठा गाजावाजा केला. कृषी संघटक, सचिव व सदस्य अशी मंडळाची कार्यकारिणीही निवडण्यात आली. काही कृषी सहायकांनी ठराविक गटाच्या मर्जीतील शेतकऱ्यांना हाताशी धरत मंडळाची स्थापना केल्याने शासनाच्या मूळ हेतूला पाने पुसण्याचा प्रकार घडला. त्याचा परिणाम अनेक शेतकऱ्यांवर झाला. शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. संबंधित मंडळांनी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कुचराई केली. त्याचबरोबर काही मंडळांनी अक्षरश: अनुदान लाटण्याचा प्रकार केला. कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, आळंबी, भाजीपाला, फुलशेती, हरितगृहे, गांडूळखत, सेंद्रीय खत आदीबाबत चर्चासत्रे घडवून आणणे क्रमप्राप्त असतानाही असे काहीच घडलेले नाही. यावेळी शासनस्तरावर कृषी विज्ञान मंडळांना टेबल, खुर्च्या, पुस्तके ठेवण्यासाठी लोखंडी कपाट देण्यात आली होती. मात्र आजच्या परिस्थितीत हे साहित्य नक्की कोणाकडे असेल? हे सांगणेसुध्दा कठीण बनले आहे. यावर संबंधित कृषी सहायकांचे नियंत्रण असायला हवे होते; परंतु दोन ते तीन आठवड्यांतून एकदाच चाफळला येणाऱ्या कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास वेळ मिळत नसल्याच्याही तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. कृषी सहायकांच्या नियंत्रणाअभावी कृषी विज्ञान मंडळांसाठी मिळालेला शासनाचा लाखोंचा निधी अक्षरश: पाण्यात गेल्याचा प्रकार झाला आहे. याची चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर) वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरजचाफळ विभागात असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रांना ऊर्जितावस्था प्राप्त करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच शासनाच्या विविध योजनांही शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे पोहोचतील. या कृषी विज्ञान केंद्रांना संजीवनी मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.