शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला, विद्याराणींचे भाग्य खुलले

By admin | Updated: July 12, 2014 23:52 IST

कऱ्हाड-महाबळेश्वर बिनविरोध : वाई अन् पाचगणीच्या लढतीकडे आता जिल्ह्याचे लक्ष

कऱ्हाड : पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी आघाडीच्या नगरसेविका अरूणा शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सत्ताधारी गटाच्या अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांची निवड निश्चित झाली आहे. या निवडीची सोमवार, दि. १४ अधिकृत घोषणा होणार आहे.सत्ताधारी गटाकडून नगराध्यक्षपदासाठी अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. विरोधी यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडीकडून अरूणा शिंंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, सत्ताधारी गटाकडे २१ सदस्य असल्याने अ‍ॅड. साळुंखे यांची निवड होणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या मुदतीत विरोधी आघाडीच्या अरूणा शिंंदे यांनी अर्ज मागे घेतला. अखेर दोन वेळा हुलकावणी देणाऱ्या नगराध्यक्षपदाची माळ अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित झाले.दरम्यान, सोमवारी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी प्रकाश रोडे यांच्याकडे अर्ज दाखल करावयाचे आहेत. त्यानंतर दुपारी दोनला प्रथम नगराध्यक्षपदाची अधिकृतरीत्या घोषणा होणार आहे. या निवडीनंतर उपाध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. छाननीनंतर पंधरा मिनिटांचा वेळ अर्ज माघारीसाठी आहे. अर्ज माघारीची वेळ संपल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची घोषणा अथवा आवश्यकता असल्यास निवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)