शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मणतात्यांच्या आठवणींनी उदयनराजे गहिवरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

सातारा : दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांची गुरुवारी जयंती होती. या जयंतीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले हे थेट विकासनगर येथील ...

सातारा : दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांची गुरुवारी जयंती होती. या जयंतीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले हे थेट विकासनगर येथील तात्यांच्या निवासस्थानी गेले. तात्यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केले. तात्यांच्या आठवणींनी ते गहिवरुन देखील गेले.

लक्ष्मणराव पाटील यांनी अनेक वर्षे जिल्हा बँकेचे संचालकपद तसेच अध्यक्षपदही भूषविले होते. त्यांच्याच काळात बँकेला आधुनिक रुप देण्यात आले. संपूर्ण देशात नंबर एकची जिल्हा बँक म्हणून नावारुपाला आणण्यात तात्यांचा मोठा वाटा आहे. आता तात्या नाहीत, त्यांच्या आठवणी तेवढ्या उरलेल्या आहेत. गुरुवारी तात्यांची जयंती होती. या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा बँकेचे संचालक खासदार उदयनराजे भोसले हे तात्यांच्या विकासनगर येथील घरी गेले होते. तात्यांच्या पत्नी सुमनकाकी पाटील यांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.

दरम्यान, उदयनराजे भोसले हे काही दिवसांपासून बदललेले पहायला मिळत आहेत. मागील आठवड्यापासून त्यांचा बदललेला नूर सगळ्यांनाच चकीत करणारा ठरला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशीही उदयनराजेंची जवळीक वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सुरुची बंगल्यात जाऊन बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली होती. नाशिक येथील पाहुण्यांच्या विवाह सोहळ्याची पत्रिका देण्याचं निमित्त असलं तरी उदयनराजेंचं जाहीरपणे शिवेंद्रसिंहराजेंना भेटणं अनेकांना सुखद धक्का देणारं होतं.

जिल्हा बँकेवर रामराजे, आमदार मकरंद पाटील, त्यांचे बंधू नितीन पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मोठा प्रभाव आहे. उदयनराजे गृहनिर्माण मतदारसंघातून जिल्हा बँकेचे संचालक आहेत. आता पुन्हा याच मतदारसंघातून ते निवडणूक लढण्याची शक्यता असल्याने या भेटीगाठींना महत्त्व आहे.

दरम्यान, लक्ष्मणतात्यांना अभिवादन करुन उदयनराजे थेट जिल्हा बँकेत आले. ते येण्यापूर्वीच संचालक मंडळाची सभा संपलेली होती. मात्र उदयनराजे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही संचालक त्यांच्या स्वागताला तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी देखील बँकेत थांबले होते. बँकेचे संचालक माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, सुरेखा पाटील, प्रदीप विधाते, प्रकाश बडेकर, राजेश वाठारकर यांनी त्यांचे स्वागत करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

निवडणुकीबाबतची याचिका निकालात

शासनाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबवली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाबळेश्वर तालुक्यातील दोन संस्थांनी निवडणूक व्हावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेची मुदत संपली असल्याने ती निकालात काढण्यात आली आहे. उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका निकालात निघाल्याची माहिती आहे.

१२ मार्च रोजी होणार यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्हा बँकेकडे पाठविण्यात आले होते. या ठरावांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. २ मार्चपर्यंत तपासणी केलेले ठराव उपनिबंधक कार्यालयाला दिले जातील. त्यानंतर दि. १२ मार्च रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

फोटो आहे : विकासनगर, सातारा येथे दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांना जयंतीनिमित्त खा. उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले. यावेळी सुमनकाकी पाटील, दत्तानाना ढमाळ, राजेश वाठारकर उपस्थित होते.

फोटो नेम : 25उदयनराजे