शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

उदयसिंह पाटलांची उद्या राजकीय एन्ट्री

By admin | Updated: May 19, 2015 22:45 IST

मलकापुरात मेळावा : कारखाना, बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वांचे लक्ष

कऱ्हाड : अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर राजकारणात पुन्हा सक्रिय होत आहेत. रयत संघटनेच्या कऱ्हाड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची कऱ्हाड येथे बैठक होऊन त्यामध्ये उदय पाटील यांच्या राजकीय एन्ट्रीचा मुहूर्त ठरविण्यात आला. त्यासाठी मलकापूरची निवड केली असून २१ मे रोजी स्वागत मेळावा होणार आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा वारसा गेल्या दहा वर्षापासून अ‍ॅड. उदयसिंह पाटील चालवत होते. गत विधानसभा निवडणुकीला अ‍ॅड. उदयसिंंह पाटीलच दावेदार होते. मात्र, मध्यंतरीच्या कालावधीत ते कायद्याच्या चौकटीत अडकले. अशातच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. उदय पाटील-उंडाळकर हे स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकरांचे नातू. वडील, चुलते यांचा राजकीय, सामाजिक सेवेचा अनेक वर्षांचा वारसा, स्वातंत्र्यपूर्व काळापासून उंडाळकर कुटुंबांचे सामाजिक योगदान पाहता त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तिने तालुक्याचे राजकारण करावे, अशीच सर्वसामान्यांची भावना असल्याने गेले सहा महिने उदयसिंंह पाटील यांची राजकीय एन्ट्री केव्हा होणार, याबाबत तालुक्यात उत्सुकता होती. यात युवा वर्ग अग्रभागी होता. बैठकीला माजी सभापती एम. जी. थोरात,संचालक हिंंदुराव चव्हाण, बबनराव साळुंखे, पैलवान जगन्नाथराव मोहिते, उपसभापती विठ्ठलराव जाधव, अ‍ॅड. अमृतराव पवार, निवासराव पाटील, माजी सभापती प्रदीप पाटील, प्रा. धनाजी काटकर, मोहनराव माने, सुहास कदम, कोयना दुध संघाचे अध्यक्ष संपतराव इंगवले, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण, उपाध्यक्ष महेशकुमार जाधव, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती१९६७ पासून उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या रयत संघटनेची कऱ्हाड येथे बैठक झाली. त्यामध्ये २१ मे रोजी तालुक्यातील रयत संघटनेच्या ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे निश्चित केले. या मेळाव्यात अ‍ॅड. उदयसिंंह पाटील यांची राजकीय पटलावर एन्ट्री होणार आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मेळावा महत्वपूर्ण ठरणार आहे.