शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

By admin | Updated: April 6, 2015 01:30 IST

हरिपुरातील घटना : दोघे बचावले; मृत राजस्थानचे

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमातील पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला, तर दोघेजण प्रसंगावधान राखून पात्राबाहेर आल्याने बचावले. मिट्टू नंदकिशोर दानका (वय २३) व राजेंद्रकुमार पप्पू वर्मा (१७, दोघे रा. राजस्थान, सध्या रा. इस्लामपूर) अशी मृतांची नावे आहेत. आज, रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. राजकुमार नंदकिशोर दानका (२४) व मोनू हनुमानदास दानका (२१, राजस्थान, सध्या रा. बोंद्रे वाडा, हरिपूर) हे दोघे बचावले आहेत. मिट्टू दानका व राजेंद्रकुमार वर्मा इस्लामपुरात भाड्याने खोली घेऊन राहात होते. ते फरशी बसविण्याचे काम करीत होते. मिट्टूचा सख्खा भाऊ राजकुमार व नातेवाईक मोनू दानका हे हरिपुरात राहतात. आज दुपारी हे चौघेही एकत्रित बसून जेवले. त्यानंतर दीड वाजता ते अंघोळ करण्यासाठी कृष्णा-वारणा संगमावर गेले होते. चौघांनाही पोहता येत नव्हते. मिट्टू व राजेंद्रकुमार पाण्याचा अंदाज घेत काठापासून जवळपास दहा फूट अंतरावर पाण्यात गेले. याठिकाणी वाळू उपशामुळे मोठा खड्डा पडला होता. याचा त्यांना अंदाज आला नाही. या खड्ड्यात मिट्टू आणि राजेंद्रचा पाय गेल्याने ते पाण्यात बुडू लागले. हा प्रकार पाहून पाठीमागे नदीकाठाजवळ अंघोळ करणाऱ्या राजकुमार व मोनू यांनी आरडाओरड केली. प्रसंगावधान राखून भीतीने ते नदीतून बाहेर आले. दरम्यान, नदीच्या काठावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघेही बुडाले होते. या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस, महापालिका अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. दुपारी अडीचपासून दोघांचा शोध सुरु होता. सायंकाळी साडेपाचला दोघांचे मृतदेह सापडले. (प्रतिनिधी)