शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

वेळे : एका भरधाव मालट्रकने समोरून निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. ...

वेळे : एका भरधाव मालट्रकने समोरून निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. अमोल शिवाजी पवार (वय ३०, रा. पिंपोडे बुद्रुक) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून, मिथुन पवार (२७) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या कोरेगाव येथे राहणारे अमोल पवार वय व मिथुन उत्तम पवार हे तरुण शिरवळ येथे मोलमजुरी करून कुटुबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून (एमएच ११ सीयू ८०८६) वरून आपल्या मूळ गावी पिंपोडेकडे निघाले होते. खंबाटकी घाटातून वेळे गावच्या हद्दीत येताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका मालट्रकने (एमएच ४३ डीजी ९९१५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालविणारा अमोल पवार याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला मिथुन पवार हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच भुर्इंज........... पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर संबंधित ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. त्याच्याविरुद्ध भुर्इंज.................. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, मृत अमोल पवार याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.