शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:34 IST

कऱ्हाड : मद्यधुंद चालकाचा ताबा सुटून कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. गुहागर - विजापूर ...

कऱ्हाड : मद्यधुंद चालकाचा ताबा सुटून कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सुपने (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान, अपघातानंतर कार महामार्गाच्या कडेला नाल्यात जाऊन पलटी झाली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर दुचाकीचाही चक्काचूर झाला आहे. कारचा चालक मद्यधुंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जमावाने त्याला चोप दिला तसेच पोलिसांच्या स्वाधीन केले.

संजय सुभाष गुरव (वय ४४, रा. सुपने) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी अजय शामराव हजारे (रा. साई प्लाझा, मेनरोड, पाटण) याच्यावर कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपने येथील संजय गुरव हे शनिवारी दुपारी दुचाकीवरून (क्र. एमएच ५० बी ८८५९) कऱ्हाडहून सुपने गावच्या दिशेने निघाले होते. ते गावानजीक पोहोचले असतानाच समोरून आलेल्या कारने (क्र. एमएच ५० एल ५४३३) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, संजय गुरव हे दुचाकीसह काही अंतरावर फरपटत जाऊन लोखंडी रेलिंगजवळ पडले. तर कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटली.

यावेळी अपघात झाल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. ग्रामस्थांनी संजय गुरव यांना उपचारार्थ कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची फिर्याद चेतन विजय पाटील (रा. सुपने) यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलिसात दिली आहे. हवालदार राजे अधिक तपास करत आहेत.

- चौकट

दुसरा युवक सुदैवाने बचावला

संजय गुरव यांच्यापासून काही अंतरावरच चेतन विजय पाटील हे दुचाकीवरून घराकडे निघाले होते. यावेळी समोरून येणारी कार वेडीवाकडी वळणे घेत आपल्याच दिशेने येत असल्याचे चेतनच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने आपली दुचाकी साईडपट्टीवरून खाली घेत थांबवली. त्यावेळी कार त्याच्या दुचाकीला कट मारून समोरून येणाऱ्या संजय गुरव यांच्या दुचाकीला धडकली. या धडकेत संजय यांचा मृत्यू झाला.

फोटो : १६केआरडी०३

कॅप्शन : गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सुपने गावच्या हद्दीत शनिवारी दुपारी दुचाकीला धडक दिल्यानंतर कार नाल्यात उलटली. (छाया : दीपक पवार)