Satara News: भरधाव कारची पाठिमागून दुचाकीस धडक, युवक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:04 IST2023-05-10T12:03:36+5:302023-05-10T12:04:14+5:30

अभिनव पवार वेळे : पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...

Two wheeler collided with a speeding car in Satara, youth killed on the spot | Satara News: भरधाव कारची पाठिमागून दुचाकीस धडक, युवक जागीच ठार

Satara News: भरधाव कारची पाठिमागून दुचाकीस धडक, युवक जागीच ठार

अभिनव पवार

वेळे : पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दत्तात्रय मानसिंग पवार (वय ३३, रा. वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.

पवार हे आपल्या दुचाकीवरुन घरी निघाले होता. दरम्यान, माळ येथील छेद रस्त्यावरच पाठीमागून भरधाव कारची त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. याच धडकेत पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे व यात्रा कमिटीचे आजीवन अध्यक्ष असणाऱ्या पवार यांच्या अपघातीमृत्यूने वेळे गावात हळहळ व्यक्त होत होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व चार वर्षांची मुलगी आहे. 

अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करीत आहेत.

ग्रामस्थांची उड्डाणपूल बांधण्याची मागणी 

वेळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायती मार्फत महामार्ग प्राधिकरणाला अनेकदा पत्रव्यवहार करून या ठिकाणी उड्डाणपूल बांधावा अशी रास्त मागणी केली. मात्र आजवर याबाबत काहीच निश्चिती मिळाली नाही. महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. 
 

Web Title: Two wheeler collided with a speeding car in Satara, youth killed on the spot