Accident News Satara: सातारा-पंढरपूर मार्गावर कारची दुचाकीस धडक, तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 17:56 IST2022-12-29T17:56:13+5:302022-12-29T17:56:41+5:30
गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला

Accident News Satara: सातारा-पंढरपूर मार्गावर कारची दुचाकीस धडक, तरुणाचा जागीच मृत्यू
गोंदवले : सातारा-पंढरपूर मार्गावर कारची दुचाकीस जोरदार धडक झाली. या अपघातात बावीस वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अविनाश दशरथ तोरसे असे मृत तरुणाचे नाव आहे. सातारा-पंढरपूर मार्गावर माणमधील पिंगळी खुर्द हद्दीत आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अविनाश तोरसे हा पिंगळी खुर्दहून खांडसरी चौकातून दहिवडीकडे दुचाकी (एमएच ११ बीडब्ल्यू ३९३४) वरून कामावर निघाला होता. दरम्यान, साताऱ्याकडून पंढरपूरकडे निघालेली कार (एमएच १५ सीटी २३५१)ने अविनाशच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये अविनाशला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दाखल झालेल्या फिर्यादीवरून दहिवडी पोलिसांनी शैलेंद्र ठाकूर (वय ४४, रा. गंगापूर रोड, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस उपनिरीक्षक जी. एम. दोलताडे तपास करत आहेत.