शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दोन दुचाकी चोरट्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST

सातारा : दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश ...

सातारा : दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

चेतन बाळासो जाधव (वय २१), सूरज परशुराम नंदीवाले (वय १९ दोघेही रा. पाचवड, ता. वाई) अशी अशी अटक करण्यात आलेल्याची नावे असून यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या सूचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पथक सातारा शहरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवारी दुपारी चार वाजता जुना आर.टी.ओ चौक ते वाडे फाटा जाणाऱ्या रस्त्यावरील जरंडेश्वर मारुती मंदिरासमोर दोन युवक वेगवेगळ्या मोटार सायकलवरून वाढे फाटा बाजूकडे जाताना पोलिसांना दिसले. त्यांच्यापैकी एकाच्या गाडीवर नंबरप्लेट नसल्याने त्यांना थांबवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील दोन्ही मोटार सायकल चोरीच्या असल्याची माहिती दिली. तसेच या दोघांची नावे चेतन आणि सूरज असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्याजवळील चोरीच्या मोटारसायकलबाबत पोलिसांनी खात्री केली असता एक मोटार सायकलच्या चोरीबाबत वाठार पोलीस ठाण्यात व दुसऱ्या मोटारसायकल चोरीबाबत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार तानाजी माने, कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर यांनी भाग घेतला.