शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या टाकीत पडून दोन भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: April 26, 2015 01:02 IST

शेंद्रेतील घटना : घरमालकावर गुन्ह्याची मागणी

सातारा : घरासमोर खेळत असताना शौचालयाच्या टाकीत पडून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शेंद्रे (ता. सातारा) येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या घटनेमुळे शेंद्रे येथे प्रचंड खळबळ उडाली असून, संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. संकेत नरेंद्र तिगाडे (वय ४), समर्थ नरेंद्र तिगाडे (५, सध्या रा. आदर्श कॉलनी, शेंद्रे, ता. सातारा. मूळ रा. व्हन्नूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी शौचालयाच्या टाकीत पडून मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. या मुलांचे वडील नरेंद्र तिगाडे हे गेल्या एक वर्षापासून शेंद्रे येथे वास्तव्यास आहेत. लिंबखिंड येथील क्रशरवर ते ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. शेंद्रे येथे ते भाड्याची खोली घेऊन राहत आहेत. त्यांच्या घरासमोर अर्धवट बांधकाम केलेले घर आहे. या घराच्या पाठीमागे तीन शौचालयाच्या टाक्या आहेत. या टाक्यांवर सुरक्षेसाठी झाकण ठेवण्यात आले नव्हते. तिगाडे यांची मुले संकेत आणि समर्थ हे दोघे शनिवारी सायंकाळी घरासमोर खेळत होते. तर त्यांची आई यल्लावा या घरामध्ये पाणी भरत होत्या. घरातील कामे आटोपून मुले कुठे गेली, हे पाहण्यासाठी त्या बाहेर आल्या; परंतु त्यांना दोन्ही मुले कुठेच दिसली नाहीत. शेजारील एका लहान मुलाला त्यांनी विचारले असता, त्या मुलाने संकेत टाकीत पडल्याचे सांगितले. हे ऐकून त्या धावतच टाकीजवळ गेल्या. त्यावेळी संकेत टाकीत पाण्यावर तरंगत होता. संकेतला तत्काळ बाहेर काढून त्यांनी आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीला धावून आले. संकेतला शेंद्रेतीलच एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. परंतु समर्थ सुद्धा त्याच टाकीमध्ये पडला आहे का, हे कोणालाही माहिती नव्हते. दोन्ही मुले एकाच टाकीत पडली असावीत, अशी लोकांना शंका आल्याने त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी टाकीच्या तळामध्ये समर्थही सापडला. दोघेही मुले बेशुद्ध पडली होती. तेथील लोकांनी नंतर दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. (प्रतिनिधी) दोन दिवसांत दुसरी घटना मेढा, (ता. जावळी) येथील गांधीनगर वसाहतीत शौचालयाच्या टाकीत पडून विनायक विकास मोरे (वय २) या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता, तर त्याची बहीण विद्या मोरे (३) ही गंभीर जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच शेंद्रे येथील संकेत आणि समर्थ या भावंडांचा मृत्यू झाल्याने मेढा येथील घटनेला उजाळा मिळाला.