सातारा : येथील करंजे परिसरातील बाबर कॉलनीत वीज कनेक्शन थकबाकी असल्याने विजेचे कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या दोन कर्मचा-यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}सुलेमान अब्बास तहसीलदार (रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे), सादीक रहीब बक्ष पैलवान (रा. गुरुवार परज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या हल्ल्यात विजय फडतरे आणि साईराज पोळ (दोघे रा. सातारा) हे जखमी झाले आहेत. हे दोघे महावितरणचे कर्मचारी आहेत. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.
याप्रकरणी विजय संपत फडतरे (वय २८, रा. म्हसवे रोड, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.