Satara Accident: रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला, कार उलटली; दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:02 IST2026-03-28T12:01:47+5:302026-03-28T12:02:53+5:30

पाच जण जखमी, देवदर्शनासाठी निघालेल्या निकम कुटुंबावर काळाचा घाला  

Two killed on the spot after car overturns in Dhuldev village near Mhaswad | Satara Accident: रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला, कार उलटली; दोघे जागीच ठार

Satara Accident: रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला, कार उलटली; दोघे जागीच ठार

म्हसवड : म्हसवडजवळ धुळदेव गावच्या हद्दीत शुक्रवार, दि. २७ रोजी सकाळी कार पलटी होऊन दोघे जण जागीच ठार झाले, तर पाच जण जखमी झाले. लक्ष्मी सचिन निकम (वय १३) व अशोक विष्णू निकम (वय ७६) अशी मृतांची नावे आहेत, तसेच सचिन अशोक निकम त्यांची पत्नी पूनम निकम, त्यांची आई व अन्य दोन मुले (नावे समजू शकली नाहीत) हे जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली, ता. सातारा येथील निकम कुटुंब देवदर्शनासाठी सातारा येथून पंढरपूरला कारने निघाले होते. ते सकाळी ९ वाजता म्हसवडहून पंढरपूरकडे निघाले होते. धुळदेव गावच्या हद्दीत उखडलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे कारवरील ताबा सुटून कारने तीन पलट्या खाल्ल्या. या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले, तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

नागरिकांची घटनास्थळी धाव...

अपघातानंतर धुळदेव ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले व म्हसवड पोलिसांना माहिती दिली. यानंतर सर्व जखमींना म्हसवड येथील रुग्णालयात आणले. त्याठिकाणी प्रथमोपचार करून तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

उखडलेल्या रस्त्यांमुळे अनेक अपघात

सातारा-सोलापूर रस्त्याचे काम धुळदेव हद्दीत आठ वर्षांपासून रखडले आहे. याठिकाणी अपघातांची मालिका सुरू असून जवळपास २० जणांना जीव गमवावा लागला आहे, तसेच ३०० हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. आणखी किती जणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल धुळदेव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Web Title : सतारा दुर्घटना: खराब सड़क के कारण कार दुर्घटनाग्रस्त, दो की मौत।

Web Summary : म्हसवड के पास, पंढरपुर जा रहे निकम परिवार की कार दुर्घटना में दो की मौत हो गई और पांच घायल हो गए। खराब सड़क के कारण चालक ने नियंत्रण खो दिया, जिससे कार पलट गई। स्थानीय लोगों ने मदद की, सड़क निर्माण में देरी और दुर्घटना की आवृत्ति को उजागर किया।

Web Title : Satara Accident: Car crash due to bad road, two dead.

Web Summary : Near Mhaswad, a car accident killed two and injured five from the Nikam family en route to Pandharpur. The driver lost control due to a poor road, causing the car to overturn. Locals assisted, highlighting ongoing road construction delays and accident frequency.