शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर वार करून दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

सणबूर : चाकूने वार करून महिलेकडील सुमारे सव्वा लाखाचे दागिने लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना पाेलिसांनी बारा तासांत गजाआड केले. ...

सणबूर : चाकूने वार करून महिलेकडील सुमारे सव्वा लाखाचे दागिने लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना पाेलिसांनी बारा तासांत गजाआड केले. ढेबेवाडी पोलिसांनी गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. अंकुश दिनकर पवार (रा. शिद्रुकवाडी, ता. पाटण) याच्यासह अन्य एकास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिद्रुकवाडीतील छाया यांच्या आई हौसाबाई कोळेकर यांना बुधवारी कारमधून तळमावले येथे एका खासगी रुग्णालयात नेले होते. दुपारी एक वाजण्याच्या कारचालक अंकुश पवार याच्यासह छाया कोळेकर व त्यांची आई हौसाबाई हे तिघेजण कारमधून पुन्हा शिद्रुकवाडीकडे जाण्यास निघाले. त्यावेळी घाटात त्यांच्या कारला एकाने हात केला. कार थांबवताच संबंधिताने चालक अंकुश पवार याच्या गळ्याला सुरा लावला. तसेच हौसाबाई कोळेकर यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतली. दुसरी बोरमाळ हिसकावत असताना छाया यांनी प्रतिकार केला असता चोरट्याने त्यांच्या हातावर वार केला. दागिने घेऊन संबंधित चोरट्यासह त्याचा साथीदार पसार झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, हवालदार खराडे, प्रशांत चव्हाण, कपिल आगलावे यांनी तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली.

फोटो २६ढेबेवाडी

शिद्रुकवाडी येथील महिलेला लुटल्याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केली.