साताऱ्यातील आडतदाराची १२ लाखांची फसवणूक, रुपये देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:24 IST2018-05-12T13:24:30+5:302018-05-12T13:24:30+5:30
बाजार समितीमधील एका धान्य व शेतमाल आडतदाराची दिल्ली व मुंबई येथील दोन व्यापाऱ्यांनी १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

साताऱ्यातील आडतदाराची १२ लाखांची फसवणूक, रुपये देण्यास टाळाटाळ
सातारा : बाजार समितीमधील एका धान्य व शेतमाल आडतदाराची दिल्ली व मुंबई येथील दोन व्यापाऱ्यांनी १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, जितेंद्र चंद्रकांत शहा (वय ४७, रा. सदरबझार सातारा) यांचे सातारा बाजार समितीमध्ये धान्य व भुसार मालाचे घाऊक दुकान आहे.
त्यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये किशन स्वरूप पांडे (रा. ओंकारनगर, दिल्ली) व संजीव किशन पांडे (रा. शिळरोड, डोंबिवली) यांना ५६ लाख ४४ हजार २३२ रुपये किमतीचा ८३९ क्विंटल राजमा शेत माल दिला. त्या बदल्यात पांडे यांनी ४५ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित ११ लाख ९४ हजार २३२ रुपये देण्यास टाळाटाळ केली.
याप्रकरणी जितेंद्र शहा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. अधिक तपास सहायक फौजदार तावरे करीत आहेत.