शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक पकडला, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 18:25 IST

संकेश्वर येथील कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक रविवारी सकाळी उंब्रज येथे गोरक्षकांनी पकडला. त्यांनी ट्रकसह 14 बैल पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देसंकेश्वर येथील कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक रविवारी सकाळी उंब्रज येथे गोरक्षकांनी पकडला. पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. उंब्रज पोलिसात फिर्याद दाखल झाली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले हे करत आहेत.

उंब्रज  - संकेश्वर येथील कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक रविवारी सकाळी उंब्रज येथे गोरक्षकांनी पकडला. त्यांनी ट्रकसह 14 बैल पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. याबाबत फिर्याद हिंदू एकता आंदोलनचे कराड उत्तरचे अध्यक्ष महेश जयवंत जाधव (रा. उंब्रज, ता. कराड) यांनी दिली आहे.

गोरक्षणाचे काम पाहणारे शिवशंकर स्वामी यांचा जाधव यांना फोन करून ‘मी पुण्यावरून कोल्हापूरकडे जात आहे. माझ्यासमोर असलेल्या ट्रकमध्ये ( एमएच 11 बीके 2002) बैल भरण्यात आले आहेत. संबंधित ट्रक सातारा बाजूकडून कराड बाजूकडे निघाले आहे अशी माहिती दिली. या माहितीनुसार, महेश जाधव, विक्रम सुरेश माने, राहुल माणिक जाधव, सचिन शिवाजी जाधव हे सर्वजण उंब्रजच्या तारळी पूल येथे थांबले. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सातारा बाजूकडून उंब्रजकडे येणारा संबंधित ट्रक दिसला. त्यास यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने ट्रक थांबविला नाही. तसाच पुढे नेला म्हणून गोरक्षकांनी पाठलाग करून ट्रक उंब्रज येथील बसस्थानकासमोर थांबवला. या ट्रकच्या हौद्यामध्ये दाटीवाटीने 14 बैल भरण्यात आलेले दिसून आले.

14 बैलांना ट्रकसह उंब्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उंब्रज पोलिसांनी ट्रकचालक जुबेर इस्माईल बेपारी, तौसिक मुनीर कुरेशी (रा. सदर बझार सातारा), नाना किसन मोहिते (रा. नागठाणे, ता. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत उंब्रज पोलिसात फिर्याद दाखल झाली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले हे करत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसArrestअटक