शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीच्या आकर्षक क्रमांकासाठी तिप्पट फी

By admin | Updated: October 16, 2014 22:50 IST

उद्यापासून नवीन मालिका : एमएच,११.बीटी एक ते ९९९९ क्रमांक

सातारा : सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दि. १८ पासून दुचाकी वाहनांसाठी एमएच ११ बीटी एक ते ९९९९ ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक क्रमांक हवे असणाऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या दुचाकीच्या मालिकेतील आकर्षक क्रमांक चारचाकीसाठी हवा असणाऱ्यास नियमानुसार तिप्पट फी भरून घ्यावा लागणार आहे, अशी माहिती देण्यात आली. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दुचाकी वाहनासाठी एमएच ११ बीटी एक ते ९९९९ ही नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पसंतीचा क्रमांक देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येतील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार नियम १९८९ च्या नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, पासपोर्ट आदींच्या साक्षांकित प्रति आवश्यक आहेत. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम ५० हजारांपेक्षा अधिक असल्यास संबंधित शुल्क राष्ट्रीयकृत बँकेच्या, शेड्यूल्ड बँकेच्या धनादेशाद्वारे भरणे बंधनकारक आहे. शनिवार, दि. १८ रोजी सकाळी १० ते दुपारी दीडपर्यंत आकर्षक क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. ज्या क्रमांकासाठी एक अर्ज आला असेल, त्या अर्जदारास त्या क्रमांकाची फी त्वरित भरावी लागणार आहे. ज्या क्रमांकासाठी जादा अर्ज येतील त्या क्रमांकाच्या अर्जाचा निकाल दुसऱ्या दिवशी दुपारी चारपर्यंत दिला जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)एकापेक्षा अधिक अर्जदार...एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशामध्ये अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी चारपर्यंत निर्धारित फीच्या रकमेचा धनाकर्ष व निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा लागेल. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेच धनाकर्ष सादर करेल, त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.