शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
2
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
3
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
4
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
5
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
6
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
7
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
8
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
9
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
10
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
11
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
12
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
13
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
14
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
15
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
16
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
17
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
18
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
19
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
20
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Bengaluru Highway Traffic: दिवाळी सुटीमुळे धरली गावाकडची वाट, पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतुकीची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:03 IST

Pune Bengaluru Highway Traffic Update: दिवाळी सुटीचा उत्साह महामार्गावरील ट्रॅफिकमध्ये हरवणार

दीपक देशमुखसातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा-कोल्हापूरदरम्यानचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘एनएचआय’ने ठेवले असले, तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद आहे. नागठाणे, उंब्रज, मलकापूर येथे तर वाहने कासवगतीने जात असून, अनेकदा वाहतूक ठप्प होते आहे. त्यातच दिवाळी सुटीसाठी हजारो चाकरमानी मुंबई-पुण्याहून गावाकडे रवाना होणार आहेत. मात्र, त्यांचा आनंद महामार्गावरील वाहतूककोंडीतच हरवण्याची चिन्हे आहेत.पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. विशेषतः मलकापूर, उंब्रज, नागठाणे परिसरात वाहने तासभर तरी अडकून पडलेली असतात. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हजारो चाकरमानी मुंबई आणि पुण्याहून गावाकडे जाणार आहेत. दिवाळी सोमवारी असल्याने शनिवार-रविवारी कोल्हापूर बाजूकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या प्रचंड वाढणार आहे. यामुळे सुट्यांचा पहिला दिवसच वाहतूककोंडीचा सामना करण्यात जाण्याची शक्यता आहे. मलकापूर, उंब्रज, नागठाणे महामार्गाची कामे बाकी असल्यामुळे हजारो वाहनांना सेवारस्त्यांवर यावे लागते. यावेळी वाहनचालकांमध्ये वादावादीही होत आहे. शनिवार-रविवारी तर कराड-सातारादरम्यान चक्काजाम झाल्यासारखी परिस्थिती असते. राष्ट्रीय महामार्गाला साजेसा उपयोग नागरिकांना होत नसल्याने टोल आकारणीबाबत फेरविचार करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.प्रदूषणात वाढहजारो वाहने रस्त्यावर धूर ओकत थांबून राहिल्याने इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहेच. शिवाय ध्वनी आणि वायुप्रदूषणातही वाढ होत आहे.बेशिस्त अवजड वाहनांमुळे अडचणीत भरमहामार्गावर काम सुरू असल्याने होणाऱ्या वाहतूककोंडीत अवजड वाहनांचे बेशिस्त चालक भर घालत आहेत. नियमांनुसार ट्रक, ट्रेलर यांसारखी अवजड वाहने डाव्या लेनने जावी लागतात; परंतु प्रत्यक्षात ही वाहने सर्रास मधल्या आणि उजव्या लेनवरून जातात. यामुळे हलक्या वाहनांना ओव्हरटेक करण्याची वेळ वारंवार येते. यामुळे अपघाताचीही शक्यता वाढत आहे. महामार्गावरील वाहतूक पोलिसांना हे प्रकार कधी दिसणार, असा सवाल उपस्थित होत आहे.कोंडीतून सुटताच वाहने बुंगाटवाहतूककोंडीत तासन्तास अडकल्याने चालकांचा संयम सुटतो. त्यामुळे कोंडीतून सुटका होताच ते गमावलेला वेळ भरून काढण्यासाठी वाहनांचा वेग वाढवतात. परिणामी अपघाताचा धोका वाढतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Rush Causes Traffic Jams on Pune-Bangalore Highway

Web Summary : Diwali holiday rush triggers massive traffic congestion on Pune-Bangalore Highway. Construction delays and undisciplined heavy vehicles worsen the situation. Travelers face long delays, increased pollution, and accident risks. Urgent action is needed.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्गDiwaliदिवाळी २०२५