Satara: कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:30 IST2025-09-05T14:30:15+5:302025-09-05T14:30:36+5:30

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होत असल्याने पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. अनेक ...

Tourists flock to Kaas Plateau as the colorful flower season begins | Satara: कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांची भेट

Satara: कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांची भेट

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होत असल्याने पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्पपठारावर रंगीबेरंगी फुलांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.

वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने गुरुवार, दि. ४ सप्टेंबरपासून हंगामाची अधिकृत सुरुवात करत चालू हंगामाचे उदघाटन उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, समिती अध्यक्ष संतोष आटाळे, उपाध्यक्ष विजय वेंदे, सदस्य दत्ता किर्दत, प्रदीप कदम, ज्ञानेश्वर आखाडे, विमल शिंगरे, विठ्ठल कदम, तानाजी आटाळे, दत्ता बादापुरे, पांडुरंग शेलार, सीताराम बादापुरे, विकास किर्दत, सोमनाथ बुढळे, वर्षा बादापुरे, कांचन किर्दत सर्व समिती सदस्य, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.

पहिल्याच दिवशी दिवसभरात ऑनलाइन, ऑफलाइन मिळून शेकडो पर्यटकांनी कासला भेट दिली. फुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण होत असल्याने कास पठारावर काही प्रकारची फुले तुरळक प्रमाणात बहरून येत्या काही दिवसातच गालीचे पाहावयास मिळणार आहेत. गेंदला चांगल्या प्रकारे बहर आहे. पर्यटकांना सुरक्षितता व सुखसुविधा देण्यासाठी वनविभाग व कार्यकारिणी समितीकडून सुरक्षारक्षक व गाइडची नेमणूक करण्यात आली आहे.

सध्या पठारावर टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, अभाळी, भुईकारवी, सोनकी, तेरडा या फुलांना तुरळक स्वरुपात बहर आला असून, पठारावरील फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. पठारावरील गेंद, सीतेची आसवे, चवर, कुमुदिनी फुलांना बहर आला असून, उर्वरित इतर फुलेही बहरण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतानाचे चित्र आहे. ई-व्हेइकल, बैलगाडीतूनही सफर होणार आहे.

पठारावर एकूण १३२ जणांना रोजगार उपलब्ध होत असून, महिला स्वयंसेवकही कार्यरत आहेत. वनसंपदेचे संरक्षण, पर्यटकांना सोयीसुविधा, स्थानिकांना रोजगार या गोष्टी केंद्रबिंदू मानून समितीचे कार्य सुरू आहे. फुले पाहात असताना पर्यटकांनी येथील दुर्मीळ फुलांची काळजी घ्यावी. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.-संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल, सातारा

Web Title: Tourists flock to Kaas Plateau as the colorful flower season begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.