शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कास पठारावर विविधरंगी फुलांसह पर्यटकांचा बहर; कुमुदिनीच्या पांढऱ्या कमळांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 16:13 IST

विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर गर्दी

पेट्री : शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पठारावरपर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून बहुसंख्य पर्यटक भेट देत असून. राजमार्गावरील कुमुदिनीची पांढरी शुभ्र कमळाची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. रविवारी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी कासच्या फुलोत्सवाचा आनंद लुटला.विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दरम्यान कास- महाबळेश्वर राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने  पर्यटक फुलांची पर्वणी स्वानुभवताना दिसत आहेत.पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू असून, ठिकठिकाणी गाईड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात पर्यटकांना मार्गदर्शन करीत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.

कुमुदिनी तकुमुदिनी तलाव हाऊसफुल्लकास पठारावर परदेशी पाहुणे देखील येथील फुलांचा नजराणा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. परदेशी पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील दुर्मीळ फुलांचे कौतुक केले आहे. तसेच तीन किलोमीटर अंतर पायी चालत देश-विदेशातील बहुसंख्य पर्यटकांची पावले राजमार्गावरील कुमुदिनी तलावाकडे वळत आहेत.

कास पुष्प पठारावर साधारण ३७५ फुलांच्या प्रजाती असून, सध्या ४० ते ५० प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू आहे. नवरात्रोत्सवात आणखी प्रजातींच्या फुलांचे फ्लॉवरिंग होण्याची शक्यता आहे. - रामानुज, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर सर्कल 

कास पुष्प पठारावरील साडेतीनशेच्या आसपास दुर्मीळ प्रजाती वर्षभर येतात. चाळीस ते पन्नास प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चांगले फ्लॉवरिंग आहे. फ्लॉवरिंगसाठी वातावरणपोषक आहे. यापेक्षा पुढील वर्षी अधिक  चांगल्या प्रकारची फुले पाहावयास मिळतील.- महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन