शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

९९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By admin | Updated: November 1, 2015 00:05 IST

प्रशासन सज्ज : निवडणुकींच्या गावांत पहारा; ६३५ जागांसाठी होणार काट्याची टक्कर

सातारा : जिल्ह्यातील १७२ पैकी ९९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १ नोव्हेंबर) जिल्हाभर मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ६३५ जागांसाठी काट्याची टक्कर होणार आहे. एका रात्रीत सर्व चित्र पालटू शकते, त्यामुळे मतदानाआधीच्या रात्री उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जागता पहारा ठेवला होता. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तहसीलदारांच्या उपस्थित शनिवारी सायंकाळी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान मशीनसह इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले. निवडणुकीसाठी ३२० केंद्रे निवडण्यात आली आहेत. सातारा तालुक्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने मतदानाची तयारी केली आहे. सातारा तालुक्यात ११७५ निवडणूक कर्मचारी १९८ केंद्रांवर सज्ज आहेत. कोरेगावमध्ये १५ केंद्रांवर १०६ कर्मचारी, जावळी तालुक्यात १६ केंद्रांवर ९० कर्मचारी, कऱ्हाड तालुक्यात ३२ केंद्रांवर १९५ कर्मचारी, माण तालुक्यात १६ केंद्रांवर १०५ कर्मचारी, पाटण तालुक्यात १५ केंद्रांवर ११६ कर्मचारी, वाई तालुक्यात १९ केंद्रांवर १०० कर्मचारी, महाबळेश्वर तालुक्यात ६ केंद्रांवर ८६ कर्मचारी, खंडाळा तालुक्यात ११ केंद्रांवर २१ कर्मचारी, फलटण तालुक्यात ३ केंद्रांवर ६५ कर्मचारी मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी सज्ज झाले आहेत. (प्रतिनिधी) दोन ग्रामपंचायती अघटित महाबळेश्वर तालुक्यातील कुमठे व वानवली तर्फ सोळशी या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्जच दाखल न झाल्याने या दोन्ही ग्रामपंचायती अघटित राहिल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आला आहे. तर सातारा तालुक्यातील नांदगावची निवडणूक रद्द झाली आहे. जिल्ह्यातल्या ७० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे आता स्पष्ट झाले असून, १७२ पैकी ९९ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.