शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

तयार ‘पीच’वर उपऱ्यांच्या ‘बॅटिंग’मुळे तिळपापड

By admin | Updated: September 25, 2014 00:31 IST

भाजप-शिवसेना : निष्ठावंत इच्छुकांचा विरोध डावलून आयात उमेदवारांना तिकिटे मिळण्याची धास्ती

सागर गुजर -सातारा  -मोदी लाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्यांकडून भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे. विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असं ही मंडळी ठणकावून सांगत आहेत. पक्षश्रेष्ठींनीही हवेच्या दिशेबाबतचे ‘होकायंत्र’ अद्याप झाकून ठेवले आहे. अशा वातावरणात दिशाहीन होण्याची वेळ भाजप व शिवसेनेच्या निष्ठांवंतांवर आली आहे. पहिली ‘बॅटिंग’ मिळेल म्हणून ‘पीच’ तयार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांनाच ‘पॅव्हेलियन’मधील राखीव खेळाडूंत बसून मॅच बघण्याची वेळ यावी, तशी या निष्ठावंताची स्थिती झाली आहे.शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. आता जावळीतलेच दीपक पवारही भाजपच्या घरात गेलेत. भाजपमध्ये प्रवेश करून पक्ष वाढविण्याच्या अटीवरच त्यांना पक्षात घेतल्याचे श्रेष्ठींनी स्पष्ट केले असले तरी या पुढील निर्णयाचा अंदाज लागत नसल्याने भाजपमधील साताऱ्यातून इच्छुक असणाऱ्या दत्ताजी थोरात व सुवर्णा पाटील यांची कोंडी झाली आहे. हे दोघेही निष्ठांवतांनाच उमेदवारी द्यावी, या मागणीवर ठाम आहेत. मात्र, पक्षानं दीपक पवार किंवा सदाशिव सपकाळ या दोघांपैकी कुणालाही उमेदवारी दिली तर थोरात व पाटील यांना पक्षनिष्ठा दाखवावीच लागणार आहे. दीपक पवार व सदाशिव सपकाळ यांनी काँगे्रस व शिवसेनेचा पाहुणचार पूर्वीच घेतला असल्याने पक्षानं निष्ठावंतांना तिकीट दिले तर पवार व सपकाळ यांना सर्व वाटा खुल्याच राहणार आहेत. त्यामुळे ‘धरलं तर चावतंय; सोडलं तर पळतंय,’ अशी वेळ निष्ठावंतांवर आली आहे.महायुतीतून रासप, स्वाभिमानी व शिवसंग्राम हे तिन्ही पक्ष बाहेर पडल्याचे वृत्त बुधवारीच धडकले असल्याने माण-खटाव व वाईची परिस्थिती ‘जैसे थे’ राहील, असे चित्र निर्माण झाले आहे. माण-खटावमधून रासपच्या उमेदवाराविरोधात भाजप कुणाला उभे करते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. वाई मतदारसंघ शिवसेनेकडेच राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने मोठ्या आशेने भाजपमध्ये दाखल झालेल्या पुरुषोत्तम जाधवांची कोंडी झाली आहे. याठिकाणी महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांचा रस्ता साफ झाल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. माजी आमदार मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांना अद्याप कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. त्यामुळे बावळेकर व मदन भोसले एकत्र येऊन आमदार मकरंद पाटलांचा सामना करणार की बावळेकर, भोसले एकमेकांशी लढून मकरंद पाटलांचा रस्ता साफ करणार, याचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल.‘वाघां’चे अवसान अन कुपोषणाचा प्रश्न!वाईतल्या मोजक्या पेठांमध्ये अस्तित्व असणारा भाजप, राष्ट्रवादी अन काँगे्रसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर चालणारे येथील ‘वाघ’ या निवडणुकीत काही प्रमाणात उसने अवसान आणतील; मात्र मुळातच ‘कुपोषणा’चा जो प्रश्न या दोन्ही पक्षांना भेडसावत होता. या प्रश्नाला हद्दपार करण्यात युतीच्या श्रेष्ठींनाच यश आलेले नाही. त्यामुळे साहजिकच बावळेकरांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यांचा सामना तालुक्यात धष्ट-पुष्ट झालेल्या राष्ट्रवादीशी होणार आहे.