शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

भेसळप्रकरणी दोघांना तीन वर्ष सक्तमजुरी

By admin | Updated: February 2, 2015 23:49 IST

वाईतील कारखान्याच्या मालकाचा समावेश

सातारा : वाई औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ‘पॅशन फूड प्रॉडक्ट’चे व्यवस्थापक बाळासाहेब रामराव गव्हाणे आणि मालक रत्नाकर आकोलकर यांना अन्न भेसळप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. नायगावकर यांच्यासमोर याची सुनावणी झाली. अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (अन्न) रामलिंंग बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाई येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ‘पॅशन फूड प्रॉडक्टस्’मध्ये मिक्सड फ्रुट जामचे उत्पादन व विक्री केली जात होती. तत्कालीन अन्न निरीक्षक दिलीप जोशी यांनी ३ जानेवारी २00३ रोजी साक्षीदार बाळू कृष्णा साळुंखे यांच्यासह कारखान्यास भेट देऊन मिक्स जामचा नमुना तपासणीसाठी घेतला होता.हा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर यामध्ये सल्फर डायआॅक्साईडचे प्रमाण मानकापेक्षा जास्त असल्यामुळे अप्रमाणित घोषित केला. परिणामी पुणे येथील अन्न व औषध सहआयुक्तांनी संबंधित कंपनी व्यवस्थापक आणि मालकाविरोधात खटला दाखल करण्यासाठी संमती दिली होती. त्यानुसार वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात व्यवस्थापक व मालकाविरुद्ध अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ या कायद्याअंतर्गत २00५ मध्ये खटला दाखल करण्यात आला होता.खटल्यामध्ये अन्न निरीक्षक व स्थानिक आरोग्य प्राधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. खटल्यामध्ये दाखल करण्यात आलेला पुरावा व सरकारी वकिलांचा युुक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरविण्यात आले. दरम्यान, हा गुन्हा अन्न भेसळप्रकरणी असून हे समाजविरोधी कृत्य असल्याने व इतरांनी त्यानुसार धडा घ्यावा यासाठी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी विनंती सरकारी वकील डी. आर. नलवडे यांनी केली. आरोपींनी अप्रमाणित व लोकांच्या आरोग्यास घातक अशा प्रकारच्या मिक्स्ड फ्रुट जाम व अन्नपदार्थाचे उत्पादन केले. त्यामुळे त्यांना दया दाखविता येणार नाही, असे प्रथमवर्ग न्यायाधीश पी. पी. नायगावकर यांनी निकालपत्रात नमूद केले. या खटल्यादरम्यान सरकारी वकिलांना अन्नसुरक्षा अधिकारी डी. एस. साळुंखे, वाय. एस. ढाणे, पोलीस हवालदार ए. एस. बांदल व पोलीस नाईक जे. व्ही. वळवी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)