महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तिघांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST2021-02-26T04:54:08+5:302021-02-26T04:54:08+5:30

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हा तालीम संघाच्या वतीने निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये ९७ किलो माती गटात जाखणगाव येथील प्रशांत ...

Three selected for Maharashtra Kesari competition | महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तिघांची निवड

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तिघांची निवड

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हा तालीम संघाच्या वतीने निवड चाचणी घेण्यात आली.

यामध्ये ९७ किलो माती गटात जाखणगाव येथील प्रशांत शिंदे याने लौकिकाला साजेशी कामगिरी करून संघातील आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यापूर्वी त्याने कांस्यपदक जिंकले होते. तो सांगली येथे भोसले व्यायामशाळेत सराव करीत आहे. खातगुण येथील शालेय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेता सुमीत गुजर याची ६१ किलो माती गटातून निवड झाली आहे. तसेच बुधचा मल्ल महेश कुंभार ७४ किलो गादी गटातून आखाड्यात उतरणार आहे.

गुजर आणि कुंभार सह्याद्री संकुल पुणे येथे सराव करीत आहेत.

विजयी मल्लांना वस्ताद शहाजी पवार, संभाजी सावर्डेकर, विजय बराटे, विकास गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Three selected for Maharashtra Kesari competition