शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

पावसापूर्वी साडेतीन हजार पूल अन् मोऱ्यांची तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:46 AM

वसापूर्वी रस्ते अधिक सुरक्षित रहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत अखत्यारित असलेल्या मार्गावर जिल्ह्यातील साडे तीन हजारांहून अधिक पूल आणि मोऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांच्या अहवालानंतर धोकादायक ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपावसापूर्वी साडेतीन हजार पूल अन् मोऱ्यांची तपासणी !सातारा बांधकाम विभाग सज्ज : गावागावांसाठी जोडणारे मार्ग होणार सुरक्षित;

सातारा : पावसापूर्वी रस्ते अधिक सुरक्षित रहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत अखत्यारित असलेल्या मार्गावर जिल्ह्यातील साडे तीन हजारांहून अधिक पूल आणि मोऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांच्या अहवालानंतर धोकादायक ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत इतर जिल्हा आणि ग्रामीण मार्ग येतात. गावागावांशी जोडणारे हे मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित असणे महत्वाचे असते. त्यासाठी जिल्हा परिषदेचा उत्तर आणि दक्षिण बांधकाम विभाग पावसापूर्वी संबंधित मार्गावरील पूल आणि मोऱ्यांची तपासणी करतो. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी कामे करण्यात येतात. धोकादायक पूल, मोऱ्यांतील घाण काढून स्वच्छ करणे, उगवलेली झाडे काढणे, पाणी मोऱ्यांतून प्रवाही राहील असे पाहण्यात येते. सध्या बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू असून लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे.बांधकामच्या उत्तर विभागाच्या अंतर्गत सातारा, कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर हे तालुके येतात. या विभागांतर्गत इतर जिल्हा मार्गावर ३ मोठे पूल आहेत. सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे उरमोडी नदीवर, हिवरे, ता. कोरेगाव येथे वांग नदीवर तसेच महाबळेश्वर तालुक्यात चतुरबेट येथे कोयना नदीवर पूल आहेत. त्याचबरोबर इतर जिल्हा मार्गावर ८०२ तर ग्रामीण मार्गावर १०९७ मोऱ्या आहेत.दक्षिण विभागा अंतर्गत माण, खटाव, कऱ्हाड , पाटण आणि जावळी हे तालुके येतात. या विभागाकडे इतर जिल्हा मार्गावरील ५६ रस्ते आहेत. त्यावर ६०१ लहान मोठे पूल आहेत. तर ग्रामीण मार्गावर १४९० रस्त्यावर १०६६ लहान मोठे पूल आहेत.या दोन्ही विभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी पूल आणि मोऱ्यांसंदर्भात तपासणी करणार आहेत. सध्या अनेक ठिकाणी काम सुरू झाले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभाग संभाव्या धोक्याच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर