सातारा : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पत्नीला धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात त्यांच्या नातेवाईकावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पत्नी तारा ओंबळे (वय ६५, रा. मूळ रा. केडंबे, ता. जावळी, सध्या रा. वरळी पोलिस कॅम्प बिल्डिंग मुंबई) यांच्या केडंबे येथील घरासमोर २० जानेवारी २०२६ रोजी घरगुती वादावरून बैठक घेतली होती. या बैठकीत संबंधित नातेवाईकाने ओंबळे यांना ‘मी स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करून घेईन’ अशी धमकी दिली. यावेळी ओंबळे यांच्यासमवेत त्यांच्या मुलीही होत्या. या प्रकारानंतर त्यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक बेसके हे करीत आहेत.
वडील जिथं शहीद झाले तेथे उपोषण करणारशहीद ओंबळे यांची मुलगी वैशाली ओंबळे यांनी आपण याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याशी चर्चा करणार असून, जर न्याय मिळाला नाही, तर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.म्हणणे काय आहे?वैशाली ओंबळे म्हणाल्या, वडिलांच्या स्मारकाच्या संदर्भात शासनासोबत होणाऱ्या मीटिंगची चुकीची माहिती आमच्या संबंधित व्यक्ती देत हाेती. मीटिंग असताना ती रद्द झाली, असे सांगत होते. त्यांचा हेतू काय होता हे समोर येणे गरजेचे आहे.
Web Summary : Tukaram Omble's wife received threats from a relative over a family dispute. A non-cognizable offense was registered. Daughter threatens hunger strike if justice isn't served.
Web Summary : तुकाराम ओंबले की पत्नी को पारिवारिक विवाद के चलते एक रिश्तेदार से धमकी मिली। असंज्ञेय अपराध दर्ज। बेटी ने न्याय न मिलने पर भूख हड़ताल की धमकी दी।